घरमुंबईमुंबईच्या महापौरपदाचा मार्ग खुला

मुंबईच्या महापौरपदाचा मार्ग खुला

Subscribe

शिवसेनेतच जोरदार रस्सीखेच

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचे सलग दुसर्‍यांदा खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिवेसेनेचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि नगरसेविका स्पर्धेत आहेत. खुल्या प्रवर्गातील आरक्षणामुळे दावेदार वाढल्यामुळे आता एकप्रकारे शिवसेनेची अडचण वाढलेली आहे. मात्र,महापौरपदाच्या या निवडणुकीत शिवसेना सेफ झोनमध्ये असल्याने कोणत्याही प्रकारची रणनिती आखली तरीही शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबई महापालिकेसह २७ महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण सोडत बुधवारी मंत्रालयात काढण्यात आली. यामध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गातील निघाले आहे. फेबु्रवारी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील होते. त्यामुळे तत्कालिन सभागृहनेते यशवंत जाधव वगळता मंगेश सातमकर, रमेश कोरगावकर, आशिष चेंबूरकर, रमाकांत रहाटे, विशाखा राउुत, श्रध्दा जाधव, मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर आदी शिवसेना नगरसेवकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत होती. परंतु आयत्यावेळी चक्रे फिरली आणि अनिल परब यांनी आपल्या मर्जीतील तसेच मातोश्रीच्या अंगणातीलच प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांची वर्णी लावली.

- Advertisement -

मातोश्रीने हा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला होता. परंतु पुन्हा एकदा मुंबई महापालिका महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील पडल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील आरक्षण पडल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर, सभागृहनेत्या विशाखा राउुत, श्रध्दा जाधव, मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर, राजुल पटेल,शुभदा गुडेकर, सदा परब,अनंत नर, दत्ता पोंगडे, अमेय घोले आदी महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे महापौरपदावर कुणाची वर्णी मातोश्रीवरून लावली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सातमकर आणि वरळीकडे सर्वांचे लक्ष
महापौरपदाचे प्रबळ दावेदार हे यशवंत जाधव आणि मंगेश सातमकर आहेत. परंतु यशवंत जाधव यांनी महापौरपद स्वीकारण्यास नकार दिल्यास शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांच्यानंतर प्रबळ दावेदार हे मंगेश सातमकर आहेत. परंतु त्यांना महापौरपदाच्या खुर्चीत बसवायचे की वरळीतील आशिष चेंबूरकर आणि किशोरी पेडणेकर यांच्याबाबत निर्णय घ्यायचा याबाबत शिवसेनेची अडचण वाढणार आहे. आदित्य ठाकरे हे आमदार झाल्यामुळे त्यांच्या वरळी मतदार संघातील महापौर व्हावा,अशी त्यांची इच्छा असली तरी चेंबूरकर आणि पेडणेकर यांच्यापैंकी कुणाची वर्णी लावायचा ही प्रमुख समस्या राहणार आहे. चेंबूरकर यांना बेस्ट समिती अध्यक्षपद दिल्यामुळे पेडणेकर यांची बाजू मजबूत आहे. मातोश्रीवर उध्दव ठाकरे आणि रश्मी वहिनींसह आदित्य ठाकरे तसेच सचिन अहिर यांच्या विश्वासातील असल्याने पेडणेकर यांची बाजू सक्षम आहे. त्यामुळे सातमकर की पेडणेकर हे आता मातोश्रीला ठरवावे लागले. परंतु स्नेहल आंबेकर यांना यापूर्वीच महापौरपद दिल्यामुळे पेडणेकर यांची बाजू कमजोर ठरणार आहे.

- Advertisement -

जाधव कुटुंबाला तिसर्‍यांदा संधी                                                                                              यापूर्वी 2००२च्या सार्वत्रिकनिवडणुकीत अनुसूचित जातीचे पुरुष प्रवर्गाचे आरक्षण निघाले तेव्हा यशवंत जाधव आणि महादेव देवळे हे स्पर्धेत होते. परंतु शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा देवळे यांना महापौर बनवले. त्यामुळे यशवंत जाधव यांना या पदाची हुलकावणी दिली. परंतु २०१४ मध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यानंतर यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यांचे नाव स्पर्धेत होते. परंतु डॉ.बावदाने यांच्यापाठोपाठ यामिनी जाधव यांचे नावे स्पर्धेत असतानाही त्यांचा पत्ता कापून स्नेहल आंबेकर यांना या पदावर बसवण्यात आले होते. परंतु यंदा खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्यामुळे जाधव कुटुंबाला तिसर्‍यांदा महापौर बनवण्याची संधी आहे. यावेळी त्यांचा स्पर्धक कुणी नसल्याने, त्यांनी जर ही संधी घालवल्यास पुन्हा मिळणार नाही.

पूर्व उपनगरांतील दोन्ही नगरसेवक आमदार                                                                                 दत्ता दळवी यांच्यानंतर पूर्व उपनगराला महापौर मिळालेला नसून भांडुपचे रमेश कोरगावकर आणि दिलीप लांडे हे आमदार बनल्यानंतर संभाव्य उमेदवारच नसल्यामुळे पुन्हा एकदा शहर आणि पश्चिम उपनगराला महापौरपद द्यावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -