घरमुंबईम्हाडाच्या २३ उपकरप्राप्त इमारती धोकादायक

म्हाडाच्या २३ उपकरप्राप्त इमारती धोकादायक

Subscribe

म्हाडाच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील माहिती

म्हाडाच्या इमारत दुरूस्ती व पुनर्चना मंडळामार्फत करण्यात आलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या सर्वेक्षणात २३ उपकरप्राप्त इमारती या धोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींचाही समावेश आहे. या अतिधोकादायक इमारतींमध्ये ५०७ निवासी आणि ३०८ अनिवासी असे एकुण ८१५ रहिवासी तसेच भाडेकरू आहेत.

आतापर्यंत १९७ भाडेकरू रहिवाशांनी त्यांची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर सहा रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे. एकुण ३२९ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. जे रहिवासी संक्रमण शिबिराचा पर्याय वापरणार नाहीत त्यांना नोटीस देऊन संक्रमण शिबिरात पाठवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती इमारत दुरूस्ती व पुनर्चना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. अतिधोकादायक इमारती खाली करून मंडळाच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला सहकार्य करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मेट्रोकडूनही सूचना

- Advertisement -

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फतही म्हाडाच्या उपकरप्राप्त धोकादायक इमारतींची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये इमारत दुरूस्ती व पुनर्चना मंडळाच्या एका इमारतीचाही समावेश आहे. गिरगावातील वांदेकर मेन्शन गी इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे एमएमआरसीमार्फत कळविण्यात आले आहे. याठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर स्थानिकांना इमारत दुरूस्तीसाठी मंडळाचे म्हणण मान्य नाही असे निदर्शनास आले आहे. त्याठिकाणी खाजगी पद्धतीने हे काम करण्यात येईल असे स्थानिकांचे मत आहे.

नियंत्रण कक्ष
धोकादायक इमारतीची लक्षणे तसेच इमारत कोसळल्याची माहिती इमारत दुरूस्ती व पुनर्चना मंडळाला देण्यासाठी २४ तास कार्यरत अशा नियंत्रण कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. २३५३६९४५ तसेच २३५१७४२३ या क्रमांकावर आणि ९१६७५५२११२ या मोबाईलवरही ही माहिती देता येईल. ताडदेव येथून या नियंत्रण कक्षाचे कामकाज चालणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -