महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील उपहारगृहांची तपासणी

महापालिकेच्या 'बी' विभागातील कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्या कारणांने आता महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील उपहारगृहांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

BMC
मुंबई महानगर पालिका मुख्यालय

महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयातील उपहार गृहातील खाद्यपदार्थामुळे झालेल्या विषबाधा प्रकरणानंतर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सर्वच विभाग कार्यालयातील उपहारगृहांची तपासणी सुरु केली आहे. २४ विभाग कार्यालाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपापल्या हद्दीतील महापालिकेच्या कार्यालयांमधील उपहारगृहांना नोटीस बजावून तेथील खाद्यपदार्थांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे.

महापालिकेच्या उपहारगृहात विषबाधा

महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयातील उपहारगृहातील इडली, डोसाचे खाद्यपदार्थ खाल्यानंतर कर्मचार्‍यांना पोटात दुखणे तसेच उलट्या, जुलाब होण्याचे प्रकार घडले. महापालिका कार्यालयातीलच उपहारगृहात झालेल्या या विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल घेत उपायुक्त (आरोग्य) सुनील धामणे यांनी महापालिका कार्यालयांतील सर्व उपहारगृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सर्व विभाग कार्यालयांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी, उपहारगृहांची तपासणी करून खाद्यपदार्थ बनवताना काळजी घेतली जावी, अशी सूचना केली आहे. तसेच उपहारगृहातील किचनसह पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वस्तुंचीही पाहणी यावेळी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थ खाल्याने झालेल्या विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे सर्व विभाग कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी तेथील उपहारगृहांना नोटीस बजावून तेथील पाहणी केली आहे. मात्र, ज्या उपहारगृहांमध्ये योग्य ती काळजी न घेतल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.  – सुनील धामणे, उपायुक्त (आरोग्य)


वाचा – पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विषबाधा, मग मुंबईकरांची काय तऱ्हा?