घरमुंबईगोवंडीत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

गोवंडीत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

Subscribe

शताब्दी हॉस्पिटलचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी तिघांनाही मृत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली.

गोवंडी येथील रहेजा कॉम्पलेक्सजवळील गणेशवाडी येथे सेप्टिक टॅंक स्वच्छ करत असताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन खाजगी मजूर येथील सेप्टिक टँक स्वच्छ करण्याचं काम करत होते. काम करत असताना मजूर टँकमध्ये अडकले. त्यांना जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शताब्दी हॉस्पिटलचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी तिघांनाही मृत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली.

हेही वाचा – मुंबई, पुणेसह नाशिकमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

दरम्यान, मे २०१९ मध्ये नालासोपारा येथे अशीच घटना घडली होती. साफसफाई करताना मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ठाण्यातील ढाकोली येथे देखील अशीच घटना घडली होती. यामध्ये तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. १७ डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टात या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

नालासोपारा, ठाण्यातसुद्धा अशाच घटना

मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा प्रकारे सेप्टिक टँकमध्ये अडकून मृत्युमुखी पडणाऱ्या कामगारांचं प्रमाण वाढत असल्याची बाब एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. १७ डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाने या जनहित याचिकेवर सुनावणी देताना राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -