घरमुंबईडोंबिवलीत मॅनहोलमध्ये पडून तिघांचा मृत्यू

डोंबिवलीत मॅनहोलमध्ये पडून तिघांचा मृत्यू

Subscribe

डोंबिवलीमध्ये मॅनहोलमध्ये पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॅनहोल सफाईसाठी गेलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवलीमध्ये मॅनहोलमध्ये पडून तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. डोंबिवलीच्या खांबाळपाडा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मॅनहोलमध्ये गुदमुरुन तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. हे तिघे जणही मॅनहोल साफ करण्यासाठी गेले होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तिघांचा मृतदेह मॅनहोलच्या बाहेर काढले आहे. देविदास पाजगे (३० वर्ष), महादेव झोपे (३८ वर्ष) आणि चंद्रभान झोपे अशी मृतांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

घातक वायूमुळे घडली घटना

डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातील नालेसफाईचे काम एमआयडीसीने ठेकेदार लक्ष्मण चव्हाण यांना दिले आहे. मॅनहोलमध्ये उतरलेल्या एक कामगार गुदमरला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन कामगार मॅनहोलमध्ये उतरले. या घटनेमध्ये तिघांचाही गुदमरुन मृत्यू झाला आहे. नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यात घातक वायू मिसळला गेल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

पोलिसांमध्ये हद्दीचा वाद

या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही घटना आमच्या हद्दीमध्ये येत नसल्याचे सांगत पोलीस निघून गेले. त्यानंतर टीळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांनी देखील हे ठिकाण आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत काढता पाय घेतला. या घटनेवर पोलिसांनी कोणतेच गांभिर्य न दाखवल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -