घरताज्या घडामोडीठाण्यात एसआरए योजनेत ३०० फूटांचे घर

ठाण्यात एसआरए योजनेत ३०० फूटांचे घर

Subscribe

८ एप्रिल २०१६ पासून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे केवळ १० प्रस्तावच आले.

मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरात एसआरए योजनेत २६९ चौरस फूटांऐवजी ३०० फूटांचे घर देण्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानपरिषदेत केली. ठाण्यातील एसआरए योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात भाजपचे सदस्य निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ठाण्यात एसआरए कार्यालय सुरु झाल्यापासून म्हणजेच ८ एप्रिल २०१६ पासून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे केवळ १० प्रस्तावच आल्याचे निरंजन डावखरे यांनी आपल्या प्रश्नात विचारले होते. मात्र, त्यावर दुरुस्ती करत एसआरएचे १९ प्रस्ताव नव्याने आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या उत्तरात सांगितले.


हेही वाचा – शिवस्मारकाच्या कामात मागच्या सरकारचे निर्णय घाईघाईत – अशोक चव्हाण

ठाणे झोपडपट्टी योजनेंतर्गत २६९ चौरस फुटांचे घर देण्याची तरतूद असल्यामुळे या पुनर्वसन योजनांना विकासकांकडून आवश्यक तो प्रतिसाद आला नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी कळवले आहे. त्यामुळे ३०० फुटांचा निर्णय घेण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

५०० फुटांचे घर कधी देणार? – गिरकर

ठाणेकरांना एसआरए योजनेत ३०० फुटांच्या घरांची घोषणा केली, या निर्णयाचे आ्म्ही स्वागतच करतो. मात्र, महा विकास आघाडीने आपल्या किमान समान कार्यक्रमात ५०० फुटांचे घर देऊ, असे सांगितले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी विचारला. त्यावर भाजपने आमच्या किमान समान कार्यक्रमाचा फारच अभ्यास केला असल्याचा टोला लगावत ५०० फुटांचे घर देण्यासाठी सरकारला अभ्यास करावा लागेल असे उत्तर दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -