घरताज्या घडामोडीप्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये करोना‌ विलगीकरण वॉर्ड

प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये करोना‌ विलगीकरण वॉर्ड

Subscribe

गावपातळीवर ही करोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून आता प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये १० खाटांचं आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही कसून तपासणी केली जात आहे. राज्यात यंत्रणा आणि प्रशासन सज्ज झालं आहे. पण, गावपातळीवर ही करोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून आता प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये १० खाटांचं आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.

ग्रामपातळीवरही जागृती निर्माण करणं गरजेचं

आतापर्यंत फक्त पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड आणि मुंबई याच महत्त्वाच्या शहरांबाबत चर्चा केली जात आहे. पण, ग्रामपातळीवरही जागृती निर्माण करणं गरजेचं असून तिथे ही करोनाचा धोका टाळता येणार नाही. त्यामुळे ग्रामपातळीवरही काळजी घेतली जाणार असून तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका आहेत, त्यांना देखील मुलभूत सुचना दिल्या जाणार आहेत. सोबतच जिल्हा हॉस्पिटल्सना महत्त्व दिलं जाणार असून प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये १० खाटांचं आयसोलेशन वॉर्ड सुरू केले गेले आहेत. ज्याचा फायदा ग्रामपातळीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना होऊ शकेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दहा खाटांचे विलगीकरण कक्ष

करोना हा विषाणू असल्याने ग्रामीण आणि शहर असा भेदभाव करणार नाही. त्याचा संसर्ग कुठेही होऊ शकतो. तसेच, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उद्रेक झालेल्या या विषाणूची माहिती आता महिनाभरानंतर ग्रामीण भागात पोहचत आहे. या बाबतची अर्धवट माहिती या विषाणू संसर्गापेक्षा धोकादायी आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा आधी विचार केला जावा अशी मागणी समोर येत आहे. यावर आरोग्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये दहा खाटांचे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, करोनासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग, दृकश्राव्य माध्यमांवर जाहिराती, चित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण, असे उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

- Advertisement -

सरकारी हॉस्पिटलही सज्ज

करोनासाठी सरकारी हॉस्पिटलही सज्ज झाले आहेत. सध्या करोना संशयित रुग्णाला कस्तुरबामध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, सरकारी हॉस्पिटलमधील आपातकालीन कक्ष, संसर्ग वॉर्ड तयार ठेवण्यात आला आहे. पण, त्या खाटा वापरण्याचे अजून आदेश नाही आहेत. त्यामुळे, संशयित करोना रुग्णाला कस्तुरबा हॉस्पिटलमध्येच पाठवायचं, असे नियम सरकारकडूनच देण्यात आले आहेत.


हेही वाचा – ठाण्यात एसआरए योजनेत ३०० फूटांचे घर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -