घरताज्या घडामोडीचर्नीरोड स्थानकानजीकच्या परिसरातील ३२ अनधिकृत झोपड्या हटविल्या

चर्नीरोड स्थानकानजीकच्या परिसरातील ३२ अनधिकृत झोपड्या हटविल्या

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानेही सोमवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नीरोड स्टेशन (पूर्व) नजीकच्या महर्षी कर्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या ३२ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून त्या जमिनदोस्त केल्या. यावेळी पालिकेच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानेही सोमवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नीरोड स्टेशन (पूर्व) नजीकच्या महर्षी कर्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या ३२ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून त्या जमिनदोस्त केल्या. यावेळी पालिकेच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलीस बंदोबस्त ठेवल्याने पलिकेने विरोधाला न जुमानता जेसीबीद्वारे अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली. (32 unauthorized huts in the area near Charni Road station were removed)

मागील काही आठवड्यात सैफी रूग्णालय परिसरात अनधिकृतपणे ३२ झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या झोपड्यांमुळे पादचा-यांना पदपथावर चालण्यास अडथळा येत होता. ज्यामुळे, अनेक पादचारी हे पदपथा नजिकच्या रस्त्यावरुन चालत असल्याने अपघाताची संभाव्यता वाढण्यासोबतच वाहतुकीला देखील अडथळा येत होता. तसेच, सदर अनधिकृत झोपड्यांबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तक्रारींची गंभीर दखल घेऊन परिमंडळ १ च्या उप आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्या आदेशाने व ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे सोमवारी सकाळपासून हायड्रो मशीन, जेसीबी, ८० कामगार यांच्या माध्यमातून ३२ अनधिकृत झोपड्यांवर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

या कारवाईसाठी ‘डी’ विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश कनोजा, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) संजय पोळ, वाहतूक पोलिस अधिकारी खिलारे, दुय्यम अभियंता (रस्ते) अभिजित रसाळ यांच्यासह ‘डी’ विभाग कार्यालयाचे अधिकारी यांचे सहकार्य घेण्यात आले. त्या ३२ अनधिकृत झोपड्या हटविल्यानंतर सदर ठिकाणी कीटक नियंत्रण खात्याद्वारे फवारणी करण्यासह संबंधित कचरा डंपरद्वारे तात्काळ हटविण्यात आला आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर पदपथ बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती शरद उघडे यांनी दिली आहे.


हेही वाचा – मुंबईत 1 ऑक्टोबरपासून रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -