घरमुंबईभाजपचा 50 कामचुकार नगरसेवकांना जोर का धक्का

भाजपचा 50 कामचुकार नगरसेवकांना जोर का धक्का

Subscribe

मुंबई – एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. यंदाची निवणूक शिंदे गट आणि मनसे एकत्र लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्धठ ठाकरेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र, अशातच भाजपच्या आजी नगरसेवकांसाठी टेन्शन वाढवणारी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आजी नगरसेवकांची तिकीट कापली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापली जाणार आहेत ते त्यांच्या वॉर्डमध्ये अकार्यक्षम असल्याचा भाजपचा सर्वे असल्याची माहिती आहे. अर्ध्या विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार असल्याने मुंबईतील भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाचे आता टेन्शन वाढले आहे.

- Advertisement -

निकाल धक्कादायक असण्याची शक्यता –

राज्यातील बदलत्या राजकीय समीरकरणांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल धक्कादायक असण्याची शक्यता आहे. भाजपला आपल्या ताब्यात मुंबई महापालिका हवी असून यासाठी भाजप आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या दर्शनासाठी आले असता उघडपणे बोलून दाखवले होते.

- Advertisement -

अमित शहा काय म्हणाले –

शिवसेनेला गाडून मुंबई जिंकण्याची संधी आहे, उद्धव ठाकरे यांनी जो धोका दिला आहे त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी, असे अमित शहा म्हणाले होते. आतापासूनच सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असली तरी मुंबई महापालिकेमध्ये कोण सत्ता मिळवणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -