घरमुंबईमुंबईत ४ लोकसभा मतदारसंघासाठी ७० लाख मतदार

मुंबईत ४ लोकसभा मतदारसंघासाठी ७० लाख मतदार

Subscribe

लोकसभा २०१९ चे बिगूल वाजले असून पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. देशात आचारसंहिता लागू झाली असून मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर २३ मे २०१९ रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ४ लोकसभा मतदार संघ आहेत. त्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत एकूण ७० लाख १ हजार ९०० मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार ३८ लाख १५ हजार २७१ तसेच स्त्री मतदार ३१ लाख ८६ हजार १४८ तर इतर मतदारांची संख्या ४८१ इतकी आहे. यासाठी ७ हजार २९७ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी ६० हजार कर्मचारी कामावर असणार आहेत.

मिडीया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC) –

  • केबल / दूरचित्रवाणी / सोशल मिडीया तसेच इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रसारित करावयाच्या निवडणूक जाहीरातीची पडताळणी आणि परवानगीसाठी मीडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.
  • आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करणेसाठी 104 – Flying Squad, 78 – Static Surveillance Team, 78 – Video Surveillance Team व 26 – Video Viewing Team विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापित करण्यात आलेल्या आहेत.

    टोल फ्री क्रमांक –

  • नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्हयासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आलेला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -