घरताज्या घडामोडीLalbaugcha Raja 2021: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न

Lalbaugcha Raja 2021: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न

Subscribe

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लालबाग राजाची मूर्ती विराजमान न होता गणेशोत्सव ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी पहाटे सहा वाजता लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ८८वे वर्ष आहे.

लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ ते रविवार १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज मंगळवार सकाळी सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या अनुषंगाने अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाऊल पूजन सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाऊल पूजन सोहळा जाहीर न करता पार पाडला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते, यंदा मात्र कोरोना संसर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाचे. यंदा लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून घेता येईल.

मंडळाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट द्या 
http://bit.ly/2uHKCz2
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट
instagram.com/lalbaugcharaja

- Advertisement -

हेही वाचा – यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -