घरमुंबईलालबाग गॅस सिलेंडर स्फोटात आतापर्यत ९ जणांचा मृत्यू

लालबाग गॅस सिलेंडर स्फोटात आतापर्यत ९ जणांचा मृत्यू

Subscribe

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मसीना रुग्णालयात उपचार घेताना बिपीन (५०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ वर गेली आहे.

लालबाग,साराभाई इमारतीमध्ये ६ डिसेंबर रोजी हळदीच्या दिवशी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी सात जखमींचा केईएम रुग्णालयात तर आणखीन एका जखमीचा मसीना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मसीना रुग्णालयात उपचार घेताना बिपीन (५०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ वर गेली आहे. आतापर्यंत चार जखमी व्यक्ती मसीना रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर आहे. तर एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेत एकूण १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी १० जणांना केईएम रुग्णालयात तर ६ जणांना मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. केईएम रुग्णालयातील १० पैकी ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मसीना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६ जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर केईएममधील ३ जणांना उपचाराने बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

सुशीला बांगरे (६२), करीम (४५), मंगेश राणे (६१), ज्ञानदेव सावंत (८५), महेश मुणगे ( ५६), विनायक शिंदे ( ५७), रोशन अंधारे (४०) आणि सूर्यकांत अंबिके (६०) आणि बिपीन (५०) अशी आत्तापर्यत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -