घरमुंबईअवयव प्रत्यारोपणामुळे ६ महिन्यांत वाचले ९१ जणांचे प्राण

अवयव प्रत्यारोपणामुळे ६ महिन्यांत वाचले ९१ जणांचे प्राण

Subscribe

अवयव प्रत्यारोपणामुळे ६ महिन्यांत ९१ जणांचे प्राण वाचले आहे. देशामध्ये अवयवदानाची खूप गरज आहे.

एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे ६ लोकांना जीवदान मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी वारंवार जनजागृती केली जाते. गेल्या सहा महिन्यांत ९१ जणांना अवयवदानामुळे जीवदान मिळाले आहे. तर १ जानेवारी ते २८ जून या कालावधीत ८५ अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने दिली आहे.

८५ अवयवांचे प्रत्यारोपण

१ जानेवारी ते २८ जून या कालावधीत ४६ मूत्रपिंड, २३ यकृत, १२ हृदय, ४ फुफ्फुस यांचे दान करण्यात आले आहे. जीवनपद्धतीत बदल, ताणतणाव, व्यसनाधिनता आणि वातावरणातील बदल यामुळे उच्चरक्तदाब, मधुमेह आणि शरीरातील ग्रंथीचे आजार उद्भवून हृदय, यकृत, मूत्रपिंड निकामी होण्याचे आणि अंधत्वाचे प्रमाण वाढते. या सर्वावर अवयव प्रत्यारोपण हा एकमेव उपचार उपलब्ध आहे. त्यासाठी अवयवदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. तरच मागणी – पुरवठ्यातील तफावत दूर करून समाजाची गरज पूर्ण करू शकू, असे डॉ. अविनाश बोकाले यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात अवयवदानाची खूप गरज

अवयवदानात ४० ते ५० प्रकारचे अवयव दान करता येऊ शकतात. बोनमॅरो, किडनी, लिव्हर हे अवयव जिवंत व्यक्ती देऊ शकतात. तर, मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान, स्कीन दान करता येते. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांमुळे आठ जणांना दृष्टी मिळू शकते. देशात अवयवदानाची खूप गरज आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनी लागतात. परंतु, प्रत्यक्षात १० हजार प्रत्यारोपण होतात. विकसित देशात मेंदू मृत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे अवयवदान करण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -