राहुल गांधींच्या यात्रेबाबत खोटी माहिती पसरविणाऱ्या विरोधात तक्रार दाखल

या युजर विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra)सुरु आहे. कन्याकुमारी (kanyakumari) पासून या पदयात्रेला सुरुवात झाली होती. दरम्यान भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत चालण्यासाठी पैसे मोजवे लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या विरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे.

प्रकाश गाडे (prakash gade) यांचे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत या पदयात्रेतही मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. असं म्हणत एका युजरने दावा केला आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत चालण्यासाठी प्रत्येकाला विशेष पास देण्यात आले होते. या एका विशेष पासची किंमत २० हजार रुपये एवढी होती. दरम्यान राहुल गांधींसोबत पदयात्रेत चालण्यासाठी २० हजार रुपये द्यायचे असा दावा एका युजरने केला आहे.

हे ही वाचा – अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो, नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

या युजर विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात प्रकाश गाडे आणि साईनाथ शिरपुरे यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात फेरफार केलेली बनावट माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान याप्रकरणी सकाळ वृत्तपत्राने भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या काही पदयात्रींशी संवाद साधला होता. यावेळी राहुल गांधींना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत चालण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.

२०२४ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पक्षबांधणीच्या उद्देशाने ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.

हे ही वाचा – आता बोरिवली येथील नॅन्सी काॅलनी रस्त्याची मालकी मुंबई महापालिकेकडे