Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईतील अंधेरी भागात ४ मजली इमारत कोसळली; ५ जण जखमी

मुंबईतील अंधेरी भागात ४ मजली इमारत कोसळली; ५ जण जखमी

Related Story

- Advertisement -

मुंबईतील अंधेरी भागात चार मजली इमारत कोसळल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत बांधकाम सुरु असणारी ४ मजली इमारत समोरच्या ३ ते ४ घरांवर कोसळली. इमारत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली ५ जण अडकले होते. ही माहिती मिळताच अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ४ तासांत अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केले. या घटनेत जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

- Advertisement -

मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडे असलेल्या जुहू गल्ली परिसरातील झोपडपट्टीत एक अनाधिकृत ४ मजली इमारत कोसळली आहे. हे बांधकाम आजूबाजूच्या ४ घरांवर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ५ जण अडकले होते. मात्र मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत बचावकार्य केलं आणि या ५ जणांचे प्राण वाचवले आहेत. या ५ जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या हा ढिगारा बाजूनला करण्याचे काम सुरू आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असल्याने घटना घडलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

अशी आहेत जखमींची नावं

१. अकबर शेख (६० वर्ष)
२. चांद शेख (३४ वर्ष)
३. आरिफ शेख (१७ वर्ष)
४. अजरा शेख (१८ वर्ष)
५. समूद्दीन शेख (५० वर्ष)


धक्कादायक! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही वर्षभरात २६ वर्षांच्या डॉक्टर तरुणीला झाला तीनदा कोरोना!

- Advertisement -