घरमुंबईपूरग्रस्तांना हवा मदतीचा हात

पूरग्रस्तांना हवा मदतीचा हात

Subscribe

सन 2005 च्या महापुरानंतर चौदा वर्षांनी पुन्हा एकदा बदलापूरला पुराचा तडाखा बसला. सुदैवाने या पुरात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांच्या घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी, सानेवाडी, हेंद्रपाडा, सर्वोदय नगर, दीपाली पार्क भागात शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ फुटांपर्यंत पाणी साचले होते.

शनिवारी सायंकाळी हे पाणी उतरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, वीज नसल्याने नागरिकांनी बाहेर राहणेच पसंत केले. रविवारी या भागात पुरामुळे झालेले लाखोंचे नुकसान समोर आले आहे. अनेक नागरिकांवर घरातील साहित्य बाहेर फेकण्याची वेळ आली, तर किराणा दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. हा सर्व कचरा रस्त्यावर टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे. 26 जुलै 2005 रोजीच्या प्रलयंकारी महापूर ओसरल्यानंतर अशीच परिस्थिती ठिकठिकाणी दिसत होती. अर्थात त्यावेळी झालेल्या नुकसानीचे स्वरूप खूपच मोठे होते.

- Advertisement -

शनिवारच्या पुराने बदलापुरातील चार चाकी आणि दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचेही दिसून आले. अनेक ठिकाणी पाण्यात अडकलेल्या चार चाकी वाहनांना टोइंग करून नेले जात होते. तसेच किराणा दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील संपूर्ण सामान आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -