घरमुंबईचिंचपाडागावात पडीक शेतात आढळला मानवी सांगाडा

चिंचपाडागावात पडीक शेतात आढळला मानवी सांगाडा

Subscribe

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिंचपाडा गाव, गावदेवी मंदिराजवळ एका पडीत शेतात मानवी सांगाडा पोलिसांना आढळला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कल्याण पूर्व येथील गावदेवी मंदिराच्या बाजूला, चिंचपाडा गाव येथे राहणार्‍या नितीन म्हात्रे यांच्या पडीत शेतातून दुर्गंधी येत होती. त्या ठिकाणी किरण म्हात्रे यांनी जावून पाहणी केली असता तिथे एक मानवी कवटी व सांगाडा आढळला.

त्या ठिकाणी तळवळकर जीमचा टी शर्ट, एक ट्रॅक पॅन्टही पडलेली होती. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम. सोनवणे यांना माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली. घटनास्थळी मिळालेला मानवी सांगाडा हा स्त्रीचा आहे की पुरुषाचा याची तपासणी सुरू केली आहे. हा सांगाडा १५ ते २० दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हा मृतदेह कोणत्यातरी जीम ट्रेनर पुरुष किंवा महिलेचा असावा असाही अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांशी 02512582009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -