Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आरेच्या ८१२ एकर जागेवर वन विभाग फुलवणार जंगल, वनसंपदेचे संवर्धन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा...

आरेच्या ८१२ एकर जागेवर वन विभाग फुलवणार जंगल, वनसंपदेचे संवर्धन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग आता मोकळा झाला

Related Story

- Advertisement -

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनविभागासाठी राखून ठेवली असून त्या जागेत वनसंपदेने संवर्धन करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आज २८६.७३२ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागास प्रत्यक्ष सोपवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी , आरे यांच्यांकडून अधिकृतपणे वनसंरक्षक यांना जागेचा ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. (aarey 812 acres of land has been officially handed over to the forest department)


आरे येथील १२५.४२२ हेक्टर जागा, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशारितीने आरेची ८१२ एकर जागा अधिकृतपणे वनविभागाकडे देण्यात आली आहे. आता वन विभाग या जागेत जंगल फुलवणार आहे. सप्टेंबर २०२०मध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला होता.

- Advertisement -

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागण्यात येणार असून त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिकेला दिलासा! महिन्याभरात बँक ठेवींमध्ये तब्बल १,५९७ कोटींची वाढ 

- Advertisement -