घरपालघरहॅलो,माने बोलतोय ! त्या फोनमुळे पोलीस सज्ज

हॅलो,माने बोलतोय ! त्या फोनमुळे पोलीस सज्ज

Subscribe

भाईंदर :- मुंबई पोलीस नियंत्रण कक्षातून रात्री २ च्या सुमारास मीरा- भाईंदर नियंत्रण कक्षाला फोन करून
मीरा- भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याबाबत एका यशवंत मानेया अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली होती. माहिती प्राप्त होताच पोलीस सुरक्षतेच्या दृष्टीने सज्ज झाले असून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. फोन करणार्‍या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

धमकीचा फोन हा फेक आहे अथवा नाही अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. मात्र फोन आल्याची माहिती मिळताच काल रात्रीपासून मीरा -भाईंदर शहरात मुख्य ठिकाणी, मॉल, शोरूम, समुद्र किनारी तसेच रस्त्यावर नाकाबंदी करत येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपासणी घेतली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे. पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत व त्यांच्या संपर्कात राहून माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती मीरा भाईंदर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -