AC LOCAL : मध्य रेल्वेला भरघोस कमाई; ७१ लाख प्रवासी, ३२ कोटी उत्पन्न

AC Local

 

मुंबईः मध्य रेल्वे वातानुकूलित उपनगरी गाडीतून गेल्या पाच महिन्यात ७१.३३ लाख प्रवाशांनी प्रवास केला व रु. ३२.२२ कोटी उत्पन्नाची नोंद झाली. मध्य रेल्वे आपल्या उपनगरीय विभागात ४ रेकसह ५६ वातानुकूलित सेवा चालवते. विशेषत: वर्षभरापूर्वी भाडे कमी केल्यानंतर सुरक्षित आणि मस्त राइड ऑफर करण्यासोबतच, वातानुकूलित लोकलने प्रवास करणे समाधानकारक झाले आहे.

रेल्वेने प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीट धारकांना प्रथम श्रेणी QST, HST आणि YST मध्ये शिल्लक राहिलेल्या दिवसांचा विचार न करता संपूर्ण कालावधीत प्रथम श्रेणी तिमाही, सहामाही व वार्षिक सीझन तिकीट आणि एसी तिमाही, सहामाही व वार्षिक सीझन तिकिटांमधील भाड्याचा फरक भरून वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची सुविधा दिली आहे.

मध्य रेल्वेतील एसी लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
• १.१.२०२३ ते २४.५.२०२३ –
एसी लोकलने प्रवास केलेल्या एकूण प्रवाशांची संख्या – ७१.३३ लाख
एसी लोकलमधून एकूण उत्पन्न – रु. ३२.२२ कोटी

• मे महिन्यात (१.५.२०२३ ते २४.५.२०२३ पर्यंत)-
एसी लोकलमधून दररोज सरासरी – ५८,८८० प्रवासी प्रवास करतात.

• एसी लोकलने प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या-
१.५.२०२२ ते २४.५.२०२२- ६.१७ लाख
१.५.२०२३ ते २४.५.२०२२३- १४.१३ लाख
मध्ये २२८% ची वाढ. प्रवाशांची

• एसी लोकलद्वारे मिळवलेला महसूल –
दि. १.५.२०२२ ते २४.५.२०२२- पर्यंत – रु. २.८३ कोटी
दि. १.५.२०२३ ते २४.५.२०२३ – रु. ६.६६ कोटी
एसी लोकलच्या उत्पन्नात २३४% ची वाढ

 

प्रवाशांची महिनावार वाढ, महसूल आणि दैनंदिन सरासरी खालीलप्रमाणे
महिना जानेवारी
प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १३.४९
महसूल (कोटींमध्ये) ५.८१
दैनिक सरासरी (प्रवासी) ४३,५३०

महिना फेब्रुवारी
प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १३.५०
महसूल (कोटींमध्ये) ५.९४
दैनिक सरासरी (प्रवासी) ४८,२२५

महिना मार्च
प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १५.१८

महसूल (कोटींमध्ये) ६.७३
दैनिक सरासरी (प्रवासी) ४८,९८९

महिना एप्रिल
प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १५.०३
महसूल (कोटींमध्ये) ७.०८
दैनिक सरासरी (प्रवासी) ५०,१०३

०१.०५.२०२३ ते ३१.०५.२०२३ पर्यंत
प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १४.१३
महसूल (कोटींमध्ये) ६.६६
दैनिक सरासरी (प्रवासी) ५८,८८०

महिना – ०१.०५.२०२३ ते ३१.०५.२०२३ पर्यंत
प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १६.००
महसूल (कोटींमध्ये) ७.५०
दैनिक सरासरी (प्रवासी) ६००००