घरमुंबईअदाणी इलेक्ट्रिसिटीचा `टेक फेस्ट`; नवीन तंत्रज्ञानाचे झाले आदानप्रदान

अदाणी इलेक्ट्रिसिटीचा `टेक फेस्ट`; नवीन तंत्रज्ञानाचे झाले आदानप्रदान

Subscribe

मुंबईः अदाणी इलेक्ट्रिसिटी, मुंबईने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन २०२३ च्या पूर्वसंध्येला पहिला टेक फेस्ट आयोजित केला होता. अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या पुढाकाराने बहुपयोगी क्षेत्रातील नाविन्यता आणि परिवर्तनावर यावेळी आयोजित उल्लेखनीय चर्चेत उद्योग जगतातील तज्ज्ञ, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेतल्याने हा कार्यक्रम एक लक्षणीय टप्पा ठरला.

टेक फेस्ट दरम्यान संबंधित उद्योग क्षेत्रातील सहभागींनी अनुभव नमूद केले. फ्लुटग्रिडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुरली कृष्णा गनमानी यांनी उपयुक्तता क्षेत्रातील स्मार्ट मीटरच्या परिवर्तनीय भूमिकेवर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. तर ई अँड वायचे (पूर्वीची अर्नस्ट अँड यंग) वरिष्ठ सल्लागार बुर्झिन भरुचा यांनी सायबरसुरक्षेचे महत्त्व यावर भर दिला. आयबीएम कन्सल्टिंगच्या ग्राहक-भागीदार विभागाचे प्रमुख शमिक गांगुली यांनी SBI Yono या ग्राहकांचे अनुभव वृद्धिंगत करणा-या तंत्रस्नेही बँक मंचाविषयी (मोबाईल अप) अनुभव नमूद केले.

- Advertisement -

टेक फेस्टमध्ये ऊर्जा क्षेत्रातील आमुलाग्र बदल, भारतीय उपयोगितेचे भवितव्य आणि तंत्रज्ञानाची भूमिका यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बहुपयोगी क्षेत्राशी संबंधित विजेवर चालणारी वाहने, ऊर्जा साठवणूक केंद्र आणि हरित उपक्रम यांचा प्रभाव, त्यातील आव्हाने आणि संधी तसेच बहुपयोगी व्यवसायातील परिवर्तन, ग्राहकांप्रती भूमिका आणि संबंध यावरही उपस्थित तज्ज्ञांनी भर दिला.

अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या पारेषण आणि वितरण विभागाचे प्रमुख सूरज फलक, श्नाइडर इलेक्ट्रिकच्या ग्लोबल इनोव्हेशन – मुंबईचे उपाध्यक्ष कंवलजीत सिंग, पीडब्ल्यूसीचे भागीदार (तंत्रज्ञान प्रमुख – स्मार्ट युटिलिटीज प्लॅटफॉर्म) शार्दुल फडणवीस, अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वाणिज्यिक व्यवस्थापन विभागाचे प्रमुख वैभव टंडन, कॉग्निझंटच्या ग्लोबल युटिलिटी प्रॅक्टिस विभागाचे प्रमुख सोमज्योती मुखर्जी यांनी यावेळी मौल्यवान विचार मांडले.

- Advertisement -

अदाणी इलेक्ट्रिसिटीने या परिसंवादासह तांत्रिक नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करत कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत स्पर्धाही याप्रसंगी आयोजित केली होती. चर्चासत्रात सहभागींनी पाच विषयांतर्गत कल्पना मांडल्या. ग्राहकांच्या अनुभवानुसार सेवेत सुधार करणे, ग्रिडची विश्वासार्हता वाढवणे, कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवणे, खर्चाचा समतोल, नवीन महसूल स्रोत निर्माण करणे आणि वीज निर्मितीमधील कामगिरी सुधारणे याबाबत सहभागींनी मते मांडली.

पहिल्या टेक फेस्टबद्दल, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, “स्पर्धेसाठी समस्या, प्रस्तावित उपाय, अपेक्षित खर्च आणि लाभ देणे हे मुद्दे सहभागी संघांसाठी अनिवार्य होते. प्रत्येक श्रेणीत निवडलेल्या तीन विजेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल यावेळी गौरविण्यात आले. इलेक्ट्रिकल पॅरामीटर मोजण्यासाठी LV सर्किट्समध्ये IoT सेन्सर वापरणे, जलद भार वाहण्यासाठी प्रीफॅब CSS स्ट्रक्चर लागू करणे आणि आवश्यकतेनुसार कमी देखभाल, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर भर देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करणे, सामग्रीच्या देखरेखीकरिता QR कोड स्कॅनर उपयोगात आणणे आणि दोष निरीक्षण व निर्णय घेण्यासाठी स्वयंचलित डॅशबोर्ड पॉवर BI वापरात आणणे अशा उल्लेखनीय कल्पनांचा समावेश होता.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -