घरताज्या घडामोडीमुंबई विमानतळावरील तोडफोडीवर अदानी समूहाची प्रतिक्रिया

मुंबई विमानतळावरील तोडफोडीवर अदानी समूहाची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई विमानतळावर आज अदानी नामफलकावरून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसले. यावेळी भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा करत अदानी एअरपोर्ट फलकाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता या घटनेवर अदानी समूहाचे स्पष्टीकरण समोर आले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) येथे अदानी विमानतळांच्या ब्रँडिंगच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बाबतीत, आम्ही ठामपणे आश्वासन देतो की, अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) ने फक्त पूर्वीच्या कंपनीच्या ब्रँडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीच्या ब्रँडिंगने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) मधील ब्रँडिंग हे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले आहे. तसेच अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राहील’, असे एएएचएलच्या प्रवक्त्याने सांगितले.

- Advertisement -

१३ जुलैला अदानी समूहाला मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट असे नामफलक अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर देखील अदानी समूहाचा फलक लावला आहे. याच फलकाची तोडफोड आज सकाळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.

मुंबई विमानतळावरील तोडफोडीचा व्हिडिओ

- Advertisement -

‘अदानी एअरपोर्ट’च्या फलकाला शिवसेनेचा विरोध | Shiv Sena opposes ‘Adani Airport’ billboard

मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसैनिकांनी विरोध करत नामफलकाची तोडफोड केली. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. त्या नामफलकाला शिवसैनिकांनी विरोध करत तो तोडून टाकला आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, August 2, 2021

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -