घरमुंबईLockDown: एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार...

LockDown: एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार…

Subscribe

एसटीच्या रायगड विभागातून सुमारे १०० चालक, वाहक मुंबई होणार दाखल

सोमवारपासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीने अतिरिक्त २५० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र मुंबई विभागात चालक -कर्मचारी यांची कमतरता असल्यामुळे एसटी महामंडळाने रायगड विभागाकडून सुमारे १०० चालक, वाहक मागविण्यात आले आहे. सोमावर सकाळीपर्यत हे शंभर चालक वाहक मुंबईत दाखल होणार आहे.

प्रवाशांसाठी गैरसोय टाळण्यासाठी एसटीचा निर्णय

१ जूनपासून राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही व्यवहारांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानूसार ५ जूनपासून अत्यावश्यक कामासाठी टॅक्सी प्रवासालाही मुभा देण्यात आली आहे. तर १० जूनपासून खाजगी कार्यालये कामगारांची १० टक्के उपस्थिती या पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कामावर जाणार्‍या प्रवाशांसाठी गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट आणि एसटीच्या विशेष बस फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमावरपासून एसटीने अतिरिक्त २५० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

- Advertisement -

मुंबईतील अनेक कर्मचारी गाव खेड्यात अडकले

या बसेस मुंबई विभागातून ,पनवेल, पालघर, आसनगाव, विरार ,नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार असून, पैकी १४२ बसेस विशेषतः मंत्रालय, १५ बसेस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. २३ मार्च पासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसेसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखी जादा बसेस एसटीकडून सोडण्यात येणार आहे. मात्र मुंबई विभागातील अनेक कर्मचारी गाव खेड्यात अटकून असल्यामुळे या २५० एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्यासाठी चालक वाहकांची कमतरता होती. त्यामुळे एसटी महामंडळाने रायगड विभागाकडून सुमारे १०० चालक, वाहक येणार असल्याने सोमावरी सकाळ पर्यत हे १०० चालक वाहक मुंबईत दाखल होणार आहे.


राज्याचे परिवहन मंत्री दाखवा, मनसेकडून बक्षीस मिळवा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -