घरCORONA UPDATEआदित्य ठाकरे यांचे काकाच्या पावलावर पाऊल; म्हणाले, वाढदिवसाचे सेलिब्रेशन नको

आदित्य ठाकरे यांचे काकाच्या पावलावर पाऊल; म्हणाले, वाढदिवसाचे सेलिब्रेशन नको

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्तांना केले असताना आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पत्रक जारी करून त्यांनी शिवसैनिकांना कळवले आहे. त्यामुळे काकाच्या पावलावर पुतण्यानेही पाऊल टाकला असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या, १३ जून रोजी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना दिले आहे.

आदित्य ठाकरे यांचे निवेदन

काय म्हणाले आदित्य ठाकरे 

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. या परिस्थितीशी आपण गेल्या २-३ महिन्यापासून एकत्रित लढा देत आहोत. माझा १३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे या परिस्थितीत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होर्डिंग्ज, हार-तुरे यावर खर्च टाळून तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, याच मला आनंद होईल, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांचेही कार्यकर्त्यांना आदेश 

तर राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यांनीही कार्यकर्त्यांना तो साजरा न करण्याच्या आदेश वजा सुचना दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी पत्र लिहून मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या वाढत्या मृत्यू संख्येमुळे समाजात दुःखाचे वातावरण असताना वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांची मदत करा, तिच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट असेल, असे म्हटले आहे.

हेही वाचा –

खुशखबर! कोरोनावर औषध निघालं; फक्त ४ दिवसांमध्ये बरा होणार ‘कोरोना’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -