घरमुंबईभाटिया हॉस्पिटलमध्‍ये प्रगत कॅथ लॅब

भाटिया हॉस्पिटलमध्‍ये प्रगत कॅथ लॅब

Subscribe

या विभागाद्वारे आता रुग्णांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे

हृदयरोग रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भाटिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सेवा या रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जावेत, यासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र ‘कॅथलॅब’ विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाद्वारे आता रुग्णांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा

बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांचं स्वरुपही बदललं. यातून हृदयविकारामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर भाटिया हॉस्पिटलकडून शहरात वाढत असलेल्‍या हृदयविकारांनी पीडित रूग्‍णांच्‍या गरजांची पूर्तता करता यावी यासाठी प्रगत कॅथ लॅब विभाग सुरू केला आहे. या विभागाअंतर्गत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधाही दिली जाणार आहे. कार्डियोलॉजी विभागामध्‍ये चोवीस तास हार्ट स्‍पेशालिस्‍ट आणि अॅनेस्थिसियोलॉजिस्ट्स कार्यरत असतील. डॉ. अनुज बासीन आणि त्‍यांची व्‍यावसायिक तज्ज्ञ इंटरवेन्‍शनल कार्डियोलिस्‍ट्स आणि सर्जन्‍सची टीम कॅथलॅब उपचार करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कडोंमपाचे नगरसेवक घाबरले, ‘म्हणे पाटीसुद्धा झाकून ठेवावी लागते’!

गरीबांना सुविधेमध्ये सूट मिळणार

जागतिक स्‍तरावर बहुतेक देशांमध्‍ये हृदयविकार मृत्‍यूचे प्रमुख कारण ठरत आहे. भारतात दरवर्षाला हृदयविकारांमुळे १७ लाखांहून अधिक लोकांचा मृत्‍यू होतो आणि वर्ष २०३० पर्यंत हा आकडा २.३ कोटी मृत्‍यूंपर्यंत वाढण्‍याचा अंदाज आहे. यासंदर्भात माहिती देताना भाटिया हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. आर. बी. दस्तुर यांनी सांगितलं की, ‘‘या कॅथलॅबद्वारे रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातील. याशिवाय या लॅबमध्ये डिजीटल अँजिओग्राफीसह रोड मॅप सुविधा असेल, जेथे रक्तवाहिन्यांचा मार्ग दाखवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅथेटर बसवण्यात येईल. याशिवाय हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या तपासणीसाठी ‘कॅथलॅब मशिनरी’सुद्धा उपलब्ध आहेत. रक्तातील गुठळ्या दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाईल. तसंच मेंदू, मूत्रपिंड, फुफ्फुस यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.” महत्त्वाचं म्हणजे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना परवडणाऱ्या दरांमध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -