घरमुंबईआंग्रीयानंतर आता कर्निका क्रुझची सेवा सुरू

आंग्रीयानंतर आता कर्निका क्रुझची सेवा सुरू

Subscribe

भारतातील पहिली मुंबई-गोवा जलमार्गावरील आंग्रीया क्रुझनंतर आता कर्निका या क्रुझची सेवा सुरू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी भारतातील पहिली मुंबई-गोवा जलमार्गावरील क्रुझ सेवा सुरू करण्यात आली होती. ‘आंग्रीया’ असे या क्रुझचे नाव होते. प्रवाशांनी या क्रुझला चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र, आता आंग्रीया क्रुझपेक्षा तीनपट प्रवाशांची क्षमता असणारी दुसरी मुंबई-गोवा जलमार्गावरील सेवा सुरू करण्यात आली आहे. ‘कर्निका’ असे या क्रुझचे नाव आहे. एकूण १६०० प्रवासी आणि ७०० क्रू मेंबरची क्षमता असणारी ही क्रुझ आहे. एका आठवड्यात तीन वेळा मुंबई-गोवा अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. आंग्रीया क्रुझनंतर आता कर्निका ही क्रुझ जलमार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी रूजू करण्यात आली आहे. कर्निका ही जलेश या कंपनीची क्रुझ आहे.

आंग्रीयाच्या तुलनेने भाडे जास्त

याआधी २०१८ मध्ये २० ऑक्टोबर दरम्यान आंग्रीया ही पहिली जलमार्गावरील क्रुझ प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी पहिल्या क्रुझचे नाव ‘आंग्रीया’ असे ठेवण्यात आले होते. आंग्रीया पाठोपाठ आता कर्निका क्रुझची सेवा सुरू झाली आहे, यामुळे मुंबई बंदरातील क्रुझ व्यवसायाला आणखीन तेजी येणार आहे. सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट आंतरारष्ट्रीय क्रुझ टर्मिनलची उभारण्याच्या मार्गावर आहे. मार्च २०२० मध्ये ही टर्मिनल सेवा सुरू होईल, अशी आपेक्षा आहे. कर्निका या क्रुझच्या एका वेळेच्या प्रवासाचे भाडे १८ ते २० हजार रूपये इतके असणार आहे. आंग्रीय या क्रुझपेक्षा कर्निका या क्रुझचे भाडे हे जास्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -