घरमुंबईरिफायनरी प्रकरणी मुख्यमंत्री नाराज होऊन गावाला गेल्याने चर्चांना उधाण; उदय सामंत म्हणाले...

रिफायनरी प्रकरणी मुख्यमंत्री नाराज होऊन गावाला गेल्याने चर्चांना उधाण; उदय सामंत म्हणाले…

Subscribe

मुंबई : राजापूर येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्व्हेक्षणावरून राज्यात राजकारण सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाराज असल्यानेच गावाकडे निघून गेल्याने तर्कवितर्कांना आणखीणच उधाण आले आहे. याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

राजापूर रिफायनरीसाठी होणाऱ्या सर्वेक्षणाविरोधात स्थानिकांनी कालपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यात आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना ताब्यात घेतल्यामुळे हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने गावाला निघून गेल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर उदय सामंत म्हणाले की, “मुख्यमंत्री गावच्या जत्रेला गेले आहेत. ते नाराज होऊन गावाला गेले असे कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.”

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री बदलासाठी दिल्लीत बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चेबाबत उदय सामंत म्हणाले की, “राजकीय वर्तुळात गेल्या ८ दिवसांपासून चर्चा सुरू की, उरलेल्या १३ आमदारांपैकी ७ आमदार आमच्याबरोबर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असून काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार अशीही चर्चा आहे. सध्या राज्यात अनेक गोष्टींवर चर्चा सुरू आहे. त्या सत्यात उतरतील तेव्हा त्याचा विचार करू. परंतु पुढील दीड वर्षे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

उद्योग आम्ही घालवतो आहे अशी भूमिका सर्वांनी घ्यावी
उदय सामंत म्हणाले, “बारसू प्रकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काय मागणी केली हा नंतरचा विषय आहे. परंतु त्या ठिकाणची वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन तीव्र होईल असे विरोधकांना वाटले होते, पण त्यांना अपेक्षित होतं तसं आंदोलन होत नाही असं विरोधकांना कळले आहे. कारण लोकांची समजूत काढण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे मला सर्वच पक्षांना विनंती करायची आहे की, जर सर्व्हेक्षण थांबवायचे असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि हा रिफायनरी उद्योग आम्ही घालवतो आहे अशी भूमिका घेतली पाहिजे, असे आव्हान उदय सामंत यांनी विरोधकांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -