घरताज्या घडामोडीकोणत्या देशाची राजधानी कोणती हे माहिती घेऊन बोलावं; अजितदादांचा राणेंना टोला

कोणत्या देशाची राजधानी कोणती हे माहिती घेऊन बोलावं; अजितदादांचा राणेंना टोला

Subscribe

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगाद्वारे भारतात आणलं जात आहेत. जे विद्यार्थी मायदेशात वर्तले त्यांचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ज्या देशातून विद्यार्थ्यांना आणलं त्या देशाचं नाव आणि राजधानीचं चुकीचं नाव घेतलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.

कोणत्या देशाची राजधानी कोणती हे माहिती घेऊन बोलावं. माहीत नसेल तर गप्प बसावं, असा टोला अजित पवार यांनी नारायण राणे यांना लगावला. नारायण राणे मंगळवारी १ मार्च २०२२ रोजी मुंबईमध्ये ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आलेल्या सातव्या विमानामधील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर हजर होते. रुमानियाची राजधानी बुकुरॅस्त येथून हे विमान १८२ भारतीयांना घेऊन मुंबईत दाखल झालं होतं. मात्र या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या नारायण राणेंना वृत्तसंस्थेशी बोलताना या देशाचं आणि त्याच्या राजधानीचं नावं नीट घेता आलं नाही.

- Advertisement -

राणे नक्की काय म्हणाले?

एएनआयशी हिंदीमध्ये बोलताना नारायण राणेंनी, “विद्यार्थी युक्रेनमध्ये होते. तेथील परिस्थिती पाहून ते घाबरले होते. त्यामुळे ते तेथून जवळच्या देशामध्ये, ‘ओमानीया’मध्ये गेले. त्या देशाची राजधानी ‘बुखारीया’ आहे,” असं म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या गैरहजेरीवर अजितदादांचा खुलासा म्हणाले, म्हणाले पाच वर्षे मुख्यमंत्री…

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -