घरट्रेंडिंगकरोनाच्या संकटातही 'मेगा भरती'ची संधी, लाखोंना मिळणार रोजगार

करोनाच्या संकटातही ‘मेगा भरती’ची संधी, लाखोंना मिळणार रोजगार

Subscribe

करोनातही संधी शोधणाऱ्या कंपन्यांमध्ये आता एमेझॉनची भर पडली आहे. एमेझॉनवर ऑनलाईन वस्तु खरेदीवर वाढत्या मागणीमुळे आता करोनाचा उलटा फटका बसत असल्याने एमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला आहे. एमेझॉनने जगभरात वाढत्या ऑनलाईन मागणीमुळेच अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमेझॉनच्या अनेक ठिकाणच्या डिलिव्हरी रखडण्यावर करोनाचा परिणाम झाला आहे. एमेझॉनच्या प्राईम डिलिव्हरी सेवेवरही याचा परिणाम झाला आहे.

एमेझॉन आपल्या वेअर हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकुण १ लाख वेअरहाऊस वर्कर्सची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या कामगारांमध्ये एकुण ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करण्याचेही एमेझॉनमार्फत जाहीर करण्यात आले आहे. डिलिव्हरी ऑपरेशन, अंतर्गत सेंटर्स आणि रिटेल स्टोअर्स अशा कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे पैसे गुंतवण्यात येतील असे एमेझॉनने स्पष्ट केले आहे. सध्याच्या वेतनामध्ये २ डॉलरने वाढ केली आहे. तर युरोपियन देशात २ युरोची प्रति तास अशी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत सेवा पुरवणे हे एक सोशल डिस्टन्सिंगचे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळेच जगभरातून ऑनलाईन खरेदीमध्ये वाढ झाली असल्याचे एमेझॉनचे जगभरातील ऑपरेशनचे प्रमुख डेव्ह क्लर्क यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

जगभरात एमेझॉनच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही ९ लाखांपर्यंत वाढवण्याचा एमेझॉनचा मानस आहे. सध्या एमेझॉनचे ७ लाख ९८ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱी आहेत. जगभरात हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरन्ट, पर्यटन यासारख्या व्यवसायातील नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच लोकांकडून आमच्या या पुढाकारासाठी मदत करण्यात येईल, तसेच आमच्या टीमशी जोडले जातील असेही त्यांनी सांगितले. आमच्या सध्याच्या डिलिव्हरी सिस्टिममध्ये दिरंगाई होत असल्याचे त्यानी मान्य केले आहे. एमेझॉन फ्रेश या सेवेत किरणा मालाची डिलिव्हरीत मोठी वाढ झाल्यानेच काही काळासाठी ही सेवा खंडित झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -