Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे Amitabh Gupta: अमिताभ गुप्तांची ९० तासात पुन्हा बदली, फडणवीसांनी भाकरी फिरवली

Amitabh Gupta: अमिताभ गुप्तांची ९० तासात पुन्हा बदली, फडणवीसांनी भाकरी फिरवली

Subscribe

 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसातच दुसऱ्यांदा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शनिवारी पुन्हा बदली करत  जोर का धक्का दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसातच दुसऱ्यांदा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शनिवारी पुन्हा बदली करत  जोर का धक्का दिला आहे. मंगळवारी उशीरा रात्री अमिताभ गुप्ता यांना पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवत अपर पोलीस महासंचालकपदावर (कायदा व सुव्यवस्था) नियुक्त केले होते. मात्र शनिवारी दुपारी पुन्हा गुप्ता यांची बदली अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आल्याने फडणवीस यांनी गुप्ता यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. हे तेच गुप्ता आहेत ज्यांनी कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये प्रसिद्ध बिल्डर वाधवान कुटुबींयांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी रेड कार्पेट घालून दिले होते. गुप्ता यांची जवळीक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी असल्याने फडणवीस यांनी गृहमंत्री झाल्यावर भाकरी फिरवत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

नुकत्याच राज्यात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात फेरबदल करण्यात आला . यात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांच्यावर अपर पोलीस महासंचालकपदाची (कायदा व सुव्यवस्था) जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र यास चार दिवस पूर्ण होण्याच्या आतच गुप्ता यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे. तर गुप्ता यांच्या जागी पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक मनोज लोहिया यांची बदली पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्तपदी करण्यात आली आहे. नव्याने केलेल्या बदल्यात आता रविंद्र शिसवे हे लोहमार्ग आयुक्त , मुंबई असतील.

नवीन आदेश आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisement -

मानवी हक्क विभागाचे विशेष मूळ पोलीस माननिरीक्षक असलेले रवींद्र शिसवे यांची बदली लोहमार्ग आयुक्त मुंबई या पदावर झाली आहे. .

संजय मोहिते सहपोलीस आयुक्त नवी मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र या पदावर नियुक्ती झाली आहे.

सुरेश कुमार मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी सिडको नवी मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे.

सुहास वारके विशेष मा निरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था या पदावर नियुक्ती झाली आहे.

मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड या पदावर नियुक्ती..

संजय दराडे अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

 

 

- Advertisment -