घरठाणेसदाभाऊंची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं वाजवणार्‍यासारखी अमोल मिटकरी यांचा पलटवार

सदाभाऊंची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं वाजवणार्‍यासारखी अमोल मिटकरी यांचा पलटवार

Subscribe

सदाभाऊ खोत यांची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं वाजवणार्‍यासारखी झाली असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मिटकरी यांनी हा पलटवार केला आहे. अमोल मिटकरी हे डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांना सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मी शेतकर्‍याचा मुलगा आहे, तर सदाभाऊ हे शेतकर्‍यांचे नेते आहेत, मात्र पिंजरा चित्रपटात गुरुजींनी आधी तमाशाला विरोध केला होता आणि नंतर त्यांनाच त्या तमाशात नाचावं लागलं. तशीच सदाभाऊंचीसुद्धा अवस्था झाली आहे. आगामी काळात भाजपच्या फडात तुणतुणं घेऊन नाचणार्‍याची सदाभाऊंची भूमिका राहील, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी यावेळी केला.

- Advertisement -

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचं भाजपचं कारस्थान असल्याचा हा प्रत्यय आहे. तसेच आपल्याला पोलिसांकडून हीन दर्जाची वागणूक दिली जाते. साधे पिण्यासाठी पाणी, चहा दिला जात नसल्याचा कांगावा नवनीत राणा यांनी केला होता, मात्र प्रत्यक्षात राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात आरामात बसून चहा, पाणी घेत असल्याचा व्हिडीओ पोलीस आयुक्तांनी ट्विट केला. आता त्यांचे वकील म्हणतात की, हा व्हिडीओ दुसर्‍या पोलीस स्टेशनचा आहे. आता तो व्हिडीओसुद्धा समोर येईलच.

गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राणा दाम्पत्याला सन्मानाची तसेच इतर कैद्यांसारखी वागणूक दिली. त्यामुळे राणा यांना आताच अ‍ॅट्रॉसिटी, दलित विषय का आठवला, असा सवाल मिटकरी यांनी यावेळी केला. मुळात त्या ज्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, त्यांची कागदपत्रे खोटी आहेत. हे एकदा तपासलं पाहिजे. कोर्टाने त्यांना एकदा फटकारलेसुद्धा आहे. राणा यांना आताच दलित, संविधान हे सगळं आठवलं हा विरोधाभास आहे. भारतीय जनता पार्टीचे हे षड्यंत्र पूर्णपणे फसले असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -