घरमुंबईआंतरराष्ट्रीय दर्जाची बँडमिंटन अकादमी उभारुन दर्जेदार खेळाडू घडविणार - उध्दव ठाकरे

आंतरराष्ट्रीय दर्जाची बँडमिंटन अकादमी उभारुन दर्जेदार खेळाडू घडविणार – उध्दव ठाकरे

Subscribe

ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सय्यद मोदी बॉडमिंटन प्रशिक्षण संस्थेतून ३२ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. ७ खेळाडू हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, 16 खेळाडू हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तर हजारोहून अधिक खेळाडू हे राज्य खेळाडू आहेत.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन अकादमी उभारण्यात येईल. या अकादमीसाठी जे जे सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य देवून या बॅडमिंटन खेळाडूच्या मागे ठाणे महापालिका भक्कमपणे उभी राहिल, अशी ग्वाही देत ठाणे शहरच ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमधील सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सोहळयात व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी प्रशिक्षकांचा केला सत्कार

ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण संस्थेस ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर सत्कार आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सर्वश्री खासदार कुमार केतकर, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, सुभाष भोईर, सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक श्रीकांत वाड, उपाध्यक्ष प्रदीप गंधे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

ऑलिम्पिक दर्जाची बॅडमिंटन अकादमी उभारण्यात येईल

ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सय्यद मोदी बॉडमिंटन प्रशिक्षण संस्थेतून ३२ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. ७ खेळाडू हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, 16 खेळाडू हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तर हजारोहून अधिक खेळाडू हे राज्य खेळाडू आहेत. आजवर हजारो खेळाडू तयार झाले आहेत. या संस्थेतील खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक मिळवावे यासाठी त्यांना सरावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील, यासाठी ऑलिम्पिक दर्जाची बॅडमिंटन अकादमी उभारण्यात येईल, अशी ग्वाही उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिली.

अत्याधुनिक असे बॅडमिंटन कोर्ट आवश्यक – एकनाथ शिंदे

राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच सत्कारमूर्ती श्रीकांत वाड यांनी सत्काराला उत्तर देताना आजवर महापालिकेने वेळोवेळी सहकार्य केले असल्याचे सांगत अत्याधुनिक असे बॅडमिंटन कोर्ट आवश्यक असल्याचे नमूद केले. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण संस्थेने आजवर केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमास बॅडमिंटनपटू, प्रशिक्षक तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – चार दिवसाचा असतानाच आईने निवडणूक बैठकीला नेलं – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -