Hospital Fire : पायपुसण्यामध्ये गुंडाळला चिमुरडीचा मृतदेह

Andheri hospital fire : father used doormat to cover daughters dead body
फोटो सौजन्य -Indian Express

सोमवारी अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत मृत पावलेल्या एका लहानग्या मुलीवर मृत्यूनंतरही वाईट परिस्थीती ओढावल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. कूपर रुग्णालयाबाहेर एक ईसम आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह हातात घेऊन उभा असल्याचा तो क्षण कॅमेरात कैद झाला. मात्र, या फोटोमधून एक भयानक बाब निर्दशनास आली. ही बाब म्हणजे सदर ईसमाने त्याच्या २ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह एका पायपुसण्यात गुंडाळला होता. मंगळवार सकाळपासून रुग्णालयामध्ये या मुलीचं शवविच्छेदन सुरु होतं. आपल्या लहानगीचा मृतदेह झाकण्यासाठी दुसरं काहीच न मिळाल्यामुळे त्या कमनशिबी बापाला पायपुसण्यामध्ये मृतदेहाला गुंडाळावं लागलं. दोन दिवसांपूर्वी कामगार रुग्णालयामध्ये झालेल्या आग दुर्घटनेत अन्य लोकांसोबत या चिमुरडीलाही आपले प्रमाण गमवावे लागले होते. मृत मुलीचे वडिल हे स्वयंपाकी म्हणून कॅटरिंग कंपनीमध्ये काम करतात.


अंधेरी आग : ‘मी झोपेतच होतो आणि अचानक काळोख झाला’

घटनेच्या दिवशी (सोमवारी) सदर व्यक्ती दिवसभर कूपर रुग्णालय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात धावपळ करत होते. कारण आगीतून वाचलेल्या त्यांच्या बहिणीला कूपर रुग्णालयात तर पत्नीला  सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान आग दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीला कुणी पाहिलं का? अशी विचारणाही ते करत होते. आगीमुळे झालेल्या धावपळीत त्यांची चिमुरडी हरवली होती. अखेर रात्री एकच्या सुमारास स्थानिक पोलीस त्यांना होली स्पिरीट रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांच्या मुलीचा मृतदेह आणण्याता आला होता. सदर मुलीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचं फॉरेन्सिक टीमने सांगितलं. आज शवविच्छेदनानंतर त्या चिमुरडीचा मृतदेह वडिलांकडे सोपवण्यात आला. याच अवस्थेत त्यांनी आपल्या चिमुरडीचा मृतदेह घरी नेल्याचं समजत आहे. दरम्यान, या चिमुरडीने जग पाहण्याआधीच आपले प्राण गमवल्यामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.