घरताज्या घडामोडीम्युनिसिपल बँकेच्या निवडणुकीवर आंगणेवाडीच्या जत्रेचे सावट

म्युनिसिपल बँकेच्या निवडणुकीवर आंगणेवाडीच्या जत्रेचे सावट

Subscribe

दि म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेड बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १७ फेबुवारी रोजी असून त्याच दिवशी आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा असल्याने याचा परिणाम निवडणूकीवर होणार आहे.

दि म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेड बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी १७ फेबुवारी रोजी होणार आहे. मात्र, नेमक्या त्याच दिवशी कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा असल्याने या जत्रेला मोठ्या प्रमाणात महापालिका कामगार कोकणात जातात. त्यामुळे या जत्रेचे सावट या निवडणुकीवर पसरल्याने मोठ्या प्रमाणात मतांची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.

दि म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेडच्या निवडणुकीत सहकार पॅनेल, जय सहकार पॅनेल, श्री शिव सहकार पॅनेल अशी तीन महत्वाची पॅनेल निवडणुक रिंगणात उतरली आहेत. सध्या बँकेच्या संचालक मंडळावर जय सहकार पॅनेलचे वर्चस्व आहे. मात्र, कधी नव्हे ही निवडणूक सध्या रंगात आली असून चर्चेचाही विषय ठरत आहे. या पॅनेलकडून अप्रत्यक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक नेहमीच्या तुलनेत लक्षात राहणारी ठरणार आहे.

- Advertisement -

१९ उमेदवार निवडणूक रिंगणात

या निवडणुकीत विद्यमान संचालक विष्णू घुमरे यांचे जय सहकार पॅनेल पुन्हा एकदा संचालक मंडळावरील वर्चस्व राखण्यासाठी मैदानात उतरले आहे. यामध्ये महावीर बनगर, सहदेव मोहिते, प्रदीप सावंत, रश्मी डावरे, वर्षा माळी यांच्यासह १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरुन विजयाचे श्रीफळ वाढवणार आहे. या पॅनेलची निशाणी दीड नारळ असल्याने कुणाचा नावाने ही श्रीफळ वाढवत आपला विजयाचा मार्ग सुकर करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जत्रेचा परिणाम निवडणुकीवर

जालंदर चकोर यांचे सहकार पॅनेलनेही याला टक्कर देण्यास मैदानात उतरले आहे. पाटीचे चिन्ह असलेल्या या पॅनेलमध्ये सखाराम तिटकारे, संतोष रेमशे, जयश्री जाधव, मंगेश शेळके आदींसह १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर श्री शिव सहकार पॅनेलचेही आनंद गावकर, राजेंद्र चाळके, राजेश दुदवडकर, राजु गिते, विनित लाड, आशा पाटील यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात उतरले आहे. शिवाय प्रमोद गिरी आणि पंकज जाधव हेही आंबा चिन्ह घेऊन या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पॅनेलमधील या आरोप-प्रत्यारोपानंतर सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये प्रत्येक जणांनी संचालक मंडळावर निवडून येण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली असली तरी नेमक्या त्याचदिवशी मालवणमधील आंगणेवाडीची जत्रा आहे. त्यामुळे या जत्रेला मोठ्या प्रमाणात महापालिकेचे कर्मचारी जात असतात. याचा परिणाम या मतदानावर होण्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेत ८१० लिपिकांच्या भरतीचा प्रस्ताव मंजूर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -