घरट्रेंडिंगअपहरण करुन ८ वर्षीय मुलीवर अत्याचार; परभणीची घटना

अपहरण करुन ८ वर्षीय मुलीवर अत्याचार; परभणीची घटना

Subscribe

हरभऱ्याचा टहाळ देतो अशी फूस देत एका २५ वर्षीय तरुणाने ८ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना परभणीत घडली आहे. शिवाय, अपहरण करुन या मुलीवर अत्याचार केल्याचं ही सांगितलं जातंय.

हरभऱ्याचा टहाळ देतो अशी फूस देत एका २५ वर्षीय तरुणाने ८ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना परभणीत घडली आहे. शिवाय, अपहरण करुन या मुलीवर अत्याचार केल्याचं ही सांगितलं जातंय. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कुंडी शिवारात ही घडली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत १५ फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणावर पोक्सो अंतर्गत कारवाई –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील कुंडी येथे गुरूवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान गावातीलच अशोक भगवान बालटकर या २५ वर्षीय युवकाने घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय मुलीला हरभऱ्याचा टहाळ देतो अशी फूस लावून तिचं अपहरण केलं होतं. पण खूप वेळ झाला तरी मुलगी घरात अंगणात आणि परिसरात दिसत नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. नेहमीच मुलीच्या घराकडे येत असलेला आरोपी अशोकसोबत मुलगी दिसल्याचे काही ग्रामस्थांनी तिच्या पालकांना सांगितले. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

- Advertisement -

आरोपीविरुद्ध मुलीला फूस लावून तिचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पालकांनी आरोपीच्या शेतात जाऊन शोध घेतला असता मुलगी त्याच्या शेतात सापडली. पालकांना पाहताच आरोपी अशोक तिथून पसार झाला. बालिकेची पोलिसांनी विचारपूस करून वैद्यकीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारी वैद्यकीय तपासणीचा अहवाल येताच आरोपी अशोक बालटकर याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -