घरमुंबईअंजली दमानियांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

अंजली दमानियांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Subscribe

अंजली दमानिया यांनी उद्धव ठाकरेंना चक्क रावण बनवले असून रावणाच्या दहा तोंडांच्या जागी अनेक नेतेमंडळींचे फोटो लावले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंसोबतच किरीट सोमय्या, निलेश राणे इत्यादी नेत्यांचे फोटो लावले आहेत. हा बॅनर उतरवायला स्वत: उद्धव ठाकरेंनी यावे, असे आव्हान अंजली दमानिया यांनी दिले आहे.

‘उद्धव ठाकरे यांना बॅनरची लाज वाटत असेल तर त्यांनी स्वत: हटवायला यावे’, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर फोटो ट्विट करत दिले आहे. या ट्विटमध्ये रावणाचा दशावताराचा पुतळा असलेल्या फोटोचे बॅनर आहे. परंतु, बॅनरमधील रावणाच्या दहा तोंडांच्या ठिकाणी वेगवेगळ्या नेतेमंडळींचे फोटो लावण्यात आले असून उद्धव ठाकरे यांचा फोटो केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. हे बॅनर खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उभे करण्यात आले असून अंजली दमानियाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई विमानतळावर काम करणारी खंबाटा एव्हिएशन कंपनी २०१६ मध्ये बंद पडली. या कार्यक्रमात २१०० कामगार कामं करत होते. कंपनी बंद झाल्यानंतर कामगारांना पगार आणि इतर भत्ते देखील मिळाले नाही. कामगारांचा थकलेला पगार मिळावा यासाठी दमानिया यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर या प्रश्नाला गती मिळाली. परंतु, निवडणूकवेळी या विषयाला घेऊन शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाचे राजकारण रंगले. परंतू, कामगारांचा प्रश्न मार्गीच लागला नाही. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन पुकारले आहे.

काय आहे ट्विट?

- Advertisement -

हेही वाचा – अंजली दमानियांना धक्का; खडसेंची बदनामी भोवली

- Advertisement -

अंजली दमानिया यांचे व्हायरल झालेले माफीचे ‘ते’ ट्वीट फेक!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -