घरमुंबईओला-उबेर चालकांचा संप मागे?

ओला-उबेर चालकांचा संप मागे?

Subscribe

२२ ऑक्टोबरपासून अॅप बेस्ड टॅक्सी चालक संपावर आहेत. या संपाचा आजचा नववा दिवस आहे. संपावर मार्ग काढण्यासाठी टॅक्सी चालक संघटना, कंपन्यांचे अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्यात सोमवारी बैठक पार पडली.

मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला अॅप बेस्ड टॅक्सी चालकांनी लगाम लावला होता. त्यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी झाला. परंतु आता या अॅप बेस टॅक्सी सेवेलाही ग्रहण लागले आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि चालकांना न मिळणारा योग्य मोबदला हे प्रश्न अॅप बेस्ड टॅक्सी सेवेला भेडसावत आहेत. योग्य मोबदला मिळत नसल्याने अॅप बेस्ड टॅक्सी चालकांनी आंदोलन सुरू केले आहे. २२ ऑक्टोबरपासून अॅप बेस्ड टॅक्सी चालक संपावर आहेत. या संपाचा आजचा नववा दिवस आहे. संपावर मार्ग काढण्यासाठी टॅक्सी चालक संघटना, कंपन्यांचे अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतु अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या अन्य प्रश्नांबाबत परिवहन आयुक्तांच्या बैठकीनंतर संपाबाबत भूमिका ठरवण्यात येईल. त्यामुळे मंगळवारीदेखील अॅप बेस्ड टॅक्सी सेवा बंद असेल. परंतु ८० टक्के मागण्या मान्य झाल्यामुळे अॅप बेस्ड टॅक्सी चालकांचा संप मागे घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आठ तासांची मॅरेथॉन बैठक

अॅप बेस्ड टॅक्सी चालकांच्या संपावर मार्ग काढण्यासाठी संघाचे अधिकारी आणि ओला-उबर व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्यात सोमवारी दुपारी झाली. ही बैठक तब्बल ८ तास सुरू होती. त्यामुळे इतक्या मोठ्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत लोकांना कुतूहल वाटत आहे.

- Advertisement -

वाचा – महिलांना नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तिघांना अटक

इतकी होणार वाढ

सोमवारी झालेल्या बैठकीत संपकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामध्ये दरांमध्ये वाढ करण्याची मागणीदेखील मान्य करण्यात आली. त्यामुळे प्रति किलोमीटर दरात अनुक्रमे १२, १५ आणि १९ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय प्रति किलोमीटर दरामागे पूर्वी कंपन्यांकडून कमिशन आकारले जात होते. हे कमिशन आता आकारले जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -