Aryan Khan Bail Hearing Update: आर्यनकडे ड्रग्ज मिळाले नाही, पण कटात सहभागी; NCB चा युक्तिवाद

aryan khan

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई, सतीश मानेशिंदे आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी कोर्टात पोहोचले आहेत. एनसीबीने आर्यन खान आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावर आपला जबाब दाखल केला आहे. एनसीबीने रिमांडमध्ये म्हटले आहे की, याप्रकरणात एका आरोपाची भूमिका दुसऱ्या आरोपीकडून समजली जात आहे. जरी आर्यन खानकडे ड्रग्ज मिळाले नसले तरी तो पेडलरच्या संपर्कात होता. हा एक मोठा कट आहे. याचा तपास सुरू आहे. आर्यन खानवर काँट्राबँड खरेदी केल्याचा आरोप केला होता आणि हा काँट्राबँड अरबाज मर्चेंटकडून जप्त करण्यात आला होता.

सध्या परदेशातील ड्रग्ज देवाणघेवाण संदर्भात एनसीबी तपास करत आहे. आज आर्यन खानसह नुपूर सारिका, अरबाज मर्चंट, मुनमुन धमचा, श्रेयस नायर, अविन साहू, आयित आणि मोहक जसवालच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या जामीनासाठी त्याचे वकील बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक वेळेस एनसीबी काहीना काही कारण देत जामीन न देण्याची मागणी करत आहेत. ११ ऑक्टोबरला सेशल कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. आज तरी आर्यनला जामीन मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा – Aryan Khan : आर्यनची अटक निव्वळ राजकारण, शाहरुखचा होतोय ‘तमाशा’, जाहिरात दिग्दर्शकाचा संताप