घरमुंबई'ठाकरे सरकारला कोकणी माणसाची कोंडी करायची आहे का?'

‘ठाकरे सरकारला कोकणी माणसाची कोंडी करायची आहे का?’

Subscribe

आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसून, आता यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर चाकरमान्यांची कोंडी करण्याची ठाकरे सरकारची इच्छा असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी गावाकडे जाण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून रेल्वे गाड्यांची मागणी केलेली नाही. ई-पास व इतर वाहतूक सुविधांचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारला कोकणी माणसाची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

अन्यथा कोकणी माणसाचीही बाप्पाशी ताटातूट होईल 

गणेशोत्सवाच्या काळात लाखो चाकरमानी कोकणात जात असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र राज्य सरकारकडून ही खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या. अन्यथा, ‘लालबागच्या राजा’च्या भक्तांप्रमाणेच कोकणी माणसाचीही बाप्पाशी ताटातूट होईल, असे शेलार म्हणालेत.

कोकणातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध साधने व निधी याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार असताना अन्न, गरम पाणी, शौचालये व औषधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्याबाबत साधा विचारही करण्यात आला नाही किंवा बैठकही घेण्यात आलेली नाही. सरकारच्या या बेफिकिरीमुळं गावकरी आणि चाकरमानी यांच्यात दरी निर्माण झाली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना शेलार यांचे प्रश्न 

१४ दिवस क्वारंटाइन व्हायचे झाल्यास ५ ऑगस्टपूर्वी चाकरमान्यांना कोकणात पोहोचावे लागेल. त्यासाठी लागणारे पास, वाहनांची सुविधा कशी व कधीपासून होणार? कधीपासून कधीपर्यंत प्रवासाला परवानगी असणार? गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची रेल्वेची तयारी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तसे स्पष्ट केले आहे. मग राज्य सरकारनं अजूनही रेल्वे गाड्यांसाठी मागणी का केली नाही?
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोफत अँटी बॉडी टेस्ट करून त्यांना प्रवासाची परवानगी का दिली जात नाही? गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सरकारनं वेळीच निर्णय न घेतल्यानं लालबागचा राजा मंडळाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा न करण्याचा निर्णय घेतला. कोकणी माणसाचीही तशीच कोंडी करण्याची सरकारची इच्छा आहे.


कोकणात जाण्यासाठी यंदा लालपरी ऐवजी जलपरीची सेवा मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -