घरमुंबईविधानसभेसाठी जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर परीक्षा

विधानसभेसाठी जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर परीक्षा

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख यांनी देखील आगामी विधानसभेसाठी दंड थोपटले असून या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा फटका बसू नये म्हणून त्यांनी आता आपला मोर्चा थेट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवर वळविला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारचा फटका बसू नये म्हणून राज्यभरातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या थेट मातोश्रीवर बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून जिल्हा निहाय जनसंपर्क आणि केलेल्या कामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. जिल्हाप्रमुखांनी देखील या परीक्षेसाठी सज्ज होत आपले अहवाल तयार करण्याची लगीनघाई सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त ‘आपलं महानगर’च्या हाती आले आहे.

- Advertisement -

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जनआशीवार्द यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा संपल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्याचबरोबर युवा सेना प्रमुख यांच्याशी आदित्य संवादच्या माध्यमातून युवकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सर्वांत आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील उडी मारली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांनी जिल्हाप्रमुखांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा फटका बसू नये, त्या त्या जिल्ह्यांचे प्रमुख काम करतात की नाही, त्यांनी आतापर्यंत किती काम केली आहेत. त्यांचा जनसंपर्क किती आहे, या सगळ्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पक्षप्रमुखांकडून बैठकांचे फार्स सुरु केले असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठका थेट मातोश्रीवर घेतल्या जात असल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकांसाठी युवा सेनेची देखील मदत घेतली जात असून जिल्हानिहाय कार्यकर्ते आणि शाखाप्रमुखांची माहिती युवासेनेकडून घेतली जात असल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या बैठका घेण्याचे सत्र सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या कानाचे त्या कानाला नको

या बैठकांची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात येत आहेत. कोणालाही या बैठकींची प्रचिती येऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा जनआशीवार्द सुरु असतानाच त्यांनी या बैठका घेण्याचे काम हाती घेतले आहेत. या बैठकीत जिल्हाप्रमुखांबरोबर इतर काही महत्वांच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात येत असून दररोज दोन ते तीन जिल्हाप्रमुखांच्या बैठका उद्धव ठाकरे स्वत: जातीने घेत आहेत. प्रत्येक जिल्हयातील समस्या ही जाणून घेत असल्याचे कळते. आगामी विधानसभेसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केलेली असताना शिवसेना पक्षप्रमुखांची ही रणनिती कितपत फायदेशीर ठरते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -