घरमुंबईभाजपमुक्त पालघरमध्ये बविआची सरशी

भाजपमुक्त पालघरमध्ये बविआची सरशी

Subscribe

पालघर जिल्ह्यातून हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, विनोद निकोले व राजेश पाटील हे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर पास्कल धनारे आणि विलास तरे हे आमदार पराभूत झाले आहेत. डहाणूतून माकपचे विनोद भिवा निकोले विजयी झाले. त्यांना 72 हजार 114 मते मिळाली. भाजपचे पास्कल धनारे यांचा त्यांनी पराभव केला. धनारे यांना 67 हजार 407 मते मिळाली. याठिकाणी नोटाला तब्बल 4824 मते मिळाली. निकोले 4 हजार 707 मतांच्या फरकाने विजयी झाले. विक्रमगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील चंद्रकांत भुसारा विजयी झाले. त्यांनी भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांचा 21 हजार 399 मतांनी पराभव केला. भुसारा यांना 88 हजार 425 मते मिळाली. तर सवरा यांना 67 हजार 26 मते मिळाली. याठिकाणी तब्बल 8 हजार 495 मते नोटाला गेली.

पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास चिंतामण वनगा विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे योगेश नम यांच्यावर 40 हजार 148 मतांनी मात केली. वनगा यांना 67 हजार 835 तर योगेश शंकर नम यांना 27 हजार 687 मते मिळाली. मनसेच्या उमेश गोवारी यांना 12 हजार 794 मते मिळाली. तर नोटाला तब्बल 7 हजार 117 मते गेली.

- Advertisement -

बोईसरमधून बहुजन विकास आघाडीचे राजेश रघुनाथ पाटील यांनी शिवसेेनेेचे विलास तरे यांचा 2 हजार 752 मतांनी पराभव केला. पाटील यांना 78 हजार 703 तर विलास तरे यांना 75 हजार 951 मते मिळाली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जनाठे तरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले. जनाठे यांनी तब्बल 30 हजार 952 मते घेतली. तर नोटाला 4 हजार 622 मते गेली.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या नालासोपारा येथील लढतीत बविआचे क्षितीज ठाकूर यांनी शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांचा 43 हजार 729 मतांनी पराभव केला. याठिकाणी चौदा उमेदवार उभे होते. पण, लढत ठाकूर आणि शर्मा यांच्यातच झाली. ठाकूर यांना 1 लाख 49 हजार 868 तर शर्मा यांना 1 लाख 6 हजार 139 मते मिळाली. नोटाला 3 हजार 221 मते गेली. बारा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

- Advertisement -

वसईत बविआचे हितेंद्र विष्णू ठाकूर यांनी शिवसेनेचे विजय पाटील यांचा 25 हजार 836 मतांनी पराभव केला. ठाकूर यांना 1 लाख 2 हजार 468 तर पाटील यांना 76 हजार 632 मते मिळाली. नोटाला 3 हजार 18 मते गेली. तर मनसेच्या प्रफुल्ल ठाकूर यांना अवघी 3 हजार 523 मते मिळाली. चार उमेदवारांची अनामत रक्कम याठिकाणी जप्त झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -