घरताज्या घडामोडीबॉयफ्रेंडसोबत लफडं करणाऱ्या मुलीसोबत गर्लफ्रेंडची फ्रिस्टाईल मारामारी, व्हिडिओ व्हायरल

बॉयफ्रेंडसोबत लफडं करणाऱ्या मुलीसोबत गर्लफ्रेंडची फ्रिस्टाईल मारामारी, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

दोन मुलींनी एका मुलीला भररस्त्यात चोप द्यायला सुरुवात केली. या व्हिडिओत दोन मुली एका मुलीला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारताना दिसत आहेत.

आधी मुलींवरुन मुलांची भांडण व्हायची मात्र आता जमाना बदलाय आता मुली मुलांवरुन भांडण करायला लागल्यात. सध्या सोशल मीडियावर मुलींचा फ्रि स्टाईल हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (at vikroli service road Girls freestyle fighting video viral on social media)   दोन मुली एका मुलीला जबरदस्त मारहाण करताना दिसत आहेत. मार खाणारी मुलगी देखील त्या मुलींना मारताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एकाच बॉयफ्रेंडवरुन या मुलींमध्ये फ्री स्टाईल मारामारी सुरू आहे. मुलीला मारणाऱ्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मार खाणाऱ्या मुलीचे लफड असल्याच्या रागातून गर्लफ्रेंडने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने बॉयफ्रेंडच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला जोरदार चोप दिला आहे असे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडिओ आहे विक्रोळीच्या सर्व्हिस रोड येथील. सकाळाच्या सुमारास दोन मुलींनी एका मुलीला भररस्त्यात चोप द्यायला सुरुवात केली. या व्हिडिओत दोन मुली एका मुलीला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे अश्लिल भाषेत शिवीगाळ देखील करत आहेत. या मुली विक्रोळीच्या टागोर नगर परिसरात राहणाऱ्या आहेत. घटनास्थळी अनेक जण असल्याचे या व्हिडिओत पहायला मिळत आहे. मात्र त्यांची भांडणे सोडवण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही असे दिसून आले आहे.

- Advertisement -

मुलींची मारामारी सुरू असताना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ शुट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी मुलींच्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलींची ही फ्री स्टाईल मारामारी पाहून नेटकरी देखील अवाक झालेत.


हेही वाचा – ‘May You All Safar’ यशराज मुखातेचा नवीन मॅशअप व्हिडिओ व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -