घरताज्या घडामोडीड्रग्ज प्रकरण: NCBच्या पथकावर मुंबईत जमावाचा हल्ला, दोन अधिकारी जखमी

ड्रग्ज प्रकरण: NCBच्या पथकावर मुंबईत जमावाचा हल्ला, दोन अधिकारी जखमी

Subscribe

गोरेगावमध्ये पेडलर्सविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एनसीबीच्या पथकावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये दोन अधिकारी जखमी झाले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकांने गोरेगावमध्ये कारवाई केली होती. यावेळी ५० ते ६० लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्यापैकी आरोपी विपुल आगरे, युसूफ शेख, अब्दुल आमीन यांना अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांवर कारवाई केली. तेव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी एनसीबीचे छापे टाकण्याचे सत्र सुरुच आहे. माहितीनुसार एनसीबी पथकावर हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली आहे. समीर वानखेडेसह एनसीबीचे पथक ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पडकण्यास गेले होते. त्यावेळेस एनसीबी पथकावर हल्ला झाला. या कारवाईसाठी पाच लोकांची टीम गेली होती. दरम्यान पेडलर कैरी मेंडिसला ताब्यात घेतले असून त्याला एनसीबी ऑफिसला आणण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान शनिवारी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि हर्षच्या घरी एनसीबीने छापा टाकला. तेव्हा त्यांच्या घरी ८६ ग्रॅम गांजाला सापडला होता. माहितीनुसार, एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि हर्षने ड्रग्ज घेण्याबाबत कबुली दिली आहे. सध्या दोघेही एनसीबीच्या ताब्यात आहेत. उद्या दोघांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. आता १५ हजारांच्या जातमुचलक्यावर दोघांचाही जामीन मंजूर झाला आहे.


हेही वाचा – वीजबिलांचा शॉक : राज ठाकरेंकडून रस्त्यावर उतरण्याचे आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -