घरमुंबईCorona Pandemic: ऑस्ट्रेलिया सरकारचे आडमुठे धोरण; भारतीयांना पाठविण्याची नकारघंटा!

Corona Pandemic: ऑस्ट्रेलिया सरकारचे आडमुठे धोरण; भारतीयांना पाठविण्याची नकारघंटा!

Subscribe

२ हजार नागरिकांना मायदेशी परतण्याची प्रतीक्षा

कोरोनाचे कारण पुढे करून ऑस्ट्रेलिया सरकारने सुमारे २ हजार भारतीय नागरिकांना मायदेशी पाठविण्यास परवानगी नाकारली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे भारतीय नागरिकांनी नाराजी वर्तविली आहे. भारतीय नागरिकत्व असलेले नवी मुंबईतील डॉ चिन्मय शेटे सध्या ऑस्ट्रेलियात अडकले आहेत. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना तातडीने मायदेशी यायचे आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे मागील तीन महिन्यांपासून त्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली जात आहे.

भारतात येण्यास ऑस्ट्रेलियाने केला मज्जाव

डॉ चिन्मय शेटे हे २०१२ साली शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया देशात गेले होते. ब्रिजबेन शहरातील ग्रफीट युनिव्हर्सिटीत त्यांनी कायद्याची आणि बॅचलर ऑफ बिझनेसची पदवी घेतली. तदनंतर, त्यांची सिडनी शहरातील इंडस इंड कंपनीत ज्युनिअर सॉलिसिटर म्हणून नेमणूक झाली. भारतीय नागरिकत्व असलेल्या डॉ चिन्मय यांच्याकडे ऑस्ट्रेलिया देशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा व्हिसा आहे. मात्र, सध्या त्यांना भारतात येण्यास ऑस्ट्रेलिया सरकारने मज्जाव केला आहे. कोविडचे कारण सांगून ऑस्ट्रेलिया सरकार परवानगी नाकारत असल्याचे डॉ चिन्मय यांचे नवी मुंबईत वास्तव्यास असलेले वडील डॉ अभय शेटे यांनी सांगितले.

- Advertisement -

मायदेशी येण्यास भारतीयांची प्रतीक्षा

भारतात येण्याच्या परवानगीसाठी मागील तीन महिन्यात चार वेळा अर्ज केला. मात्र, प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलिया सरकारने नकारघंटा वाजविल्याचे ते म्हणाले. डॉ चिन्मय सोबत असलेले सुमारे २ हजार भारतीय नागरिक मायदेशी येण्यास प्रतीक्षा करीत आहेत. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून, स्वतःच्या जबाबदारीवर येण्याची आमची जबाबदारी असताना सरकार परवानगी नाकारत असल्याचे डॉ अभय शेटे म्हणाले. एकीकडे ऑस्ट्रेलिया सरकार अत्यावश्यक करण असल्यास पाठविले जाईल असा फतवा काढते, दुससरीकडे परवानगी नाकारते, मग आम्ही करायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. भारत सरकारने याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ अभय शेटे यांनी केली आहे.


कोरोनाचा ‘डबल अटॅक’! एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -