बाब्बो! मुंबईतील ट्रिप्लेक्स अपार्टमेंटसाठी २५२ कोटींचा सौदा, स्टॅम्प ड्युटी ऐकून येईल भोवळ

union budget 2023 fm nirmala sitharaman announces increase in pmay pradhan mantri awas yojana

मुंबई – मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. बंगला किंवा फ्लॅट नसला तरीही छोटीशी झोपडी (Budget Homes in Mumbai) स्वतःच्या नावावर करण्याकरता अनेकजण धडपडत असतात. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत घर घेण्याचं अनेकाचं स्वप्न अधुरच राहतं. पण, बडे व्यावसायिक गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईत अनेकदा व्यवहार करतात. सर्वाधिक व्यवहार हे रिअल इस्टेटसंबंधित असतात. असाच एक मोठा व्यवहार मुंबईत झाला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक आणि बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज (Neeraj Bajaj) यांनी मुंबईत तब्बल २५२ कोटी ५० लाख रुपये किंमत असलेला ट्रिप्लेक्स अपार्टमेंट (Triplex Apartments in mumbai) घेतला आहे. या अपार्टमेंटसाठी त्यांनी मोजलेल्या स्टॅम्प ड्युटीत (Stamp Duty) तुम्ही-आम्ही चांगली अलिशान अशी जवळपास १५ घरे सहज घेऊ शकू.

IndexTap.com ने याबाबत माहिती दिली आहे. Lodha Malabar Palaces by the Sea या प्रोजेक्टमध्ये नीरज बजाज यांनी २५२ कोटी ५० लाखांची गुंतवणूक केली आहे. यांनी एका इमारतीतील २९,२० आणि ३१ मजले विकत घेतले असून या तिन्ही मजल्यांसाठी २५२ कोटींचा सौदा केला आहे. यासाठी भरावी लागणारी स्टॅम्प ड्युटीच्या रकमेत तुम्ही मुंबईत चांगल्या ठिकाणी जवळपास १५ फ्लॅट्स तरी सहज घेऊ शकाल. स्टॅम्प ड्युटीही ही रक्कम आहे तब्बल १५ कोटी १५ लाख रुपये.

या फ्लॅट्सचे वैशिष्ट्य काय?

  • या ट्रिप्लेक्स फ्लॅटला ८ कार पार्किंग स्लॉट मिळणार आहेत.
  • २९ व्या मजल्यावर ६०६१चौरस फुटाचा फ्लॅट आहे. ३० व्या मजल्यावर ३५९३ चौरस फूट, तर ३१ व्या मजल्यावर २९२९ चौरस फुटांचा फ्लॅट आहे.
  • प्रत्येक फ्लॅटला जवळपास १४४१ चौरस फुटांची गॅलरी देण्यात आली आहे.
  • १,४०,२७७ प्रती चौरस फुटांनी ही डील करण्यात आली आहे.
  • जून २०२६ मध्ये हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार असून यामध्ये दोन विंग्समध्ये ३६ फ्लॅट्स बांधण्यात येणार आहेत.