घरताज्या घडामोडीवांद्रे वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

वांद्रे वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Subscribe

वांद्रे वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंक या प्रस्तावित प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची मागणी केली जात होती. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वांद्रे-वर्सोवा सी-लिंक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नावे देण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते.

वांद्रे वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंक या प्रस्तावित प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची मागणी केली जात होती. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वांद्रे-वर्सोवा सी-लिंक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नावे देण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त याबाबत घोषणा केली. (Bandra Versova sea link named as swatantra veer savarkar announcement of cm eknath shinde)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घोषणा केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या राज्यातील शूरवीर आणि वीरांगणांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्याची मागणीही केली जात आहे. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 366 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील महत्त्वाकांशी असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ‘शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे आहे’, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.


हेही वाचा – ‘अहंकारी राजा’; कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -