घरमुंबईरस्त्यांच्या मुद्द्याबाबत आक्रमक होण्यापूर्वीच भाजपची तलवार म्यान

रस्त्यांच्या मुद्द्याबाबत आक्रमक होण्यापूर्वीच भाजपची तलवार म्यान

Subscribe

विधीमंडळात अ‍ॅड. आशिष शेलार यांनी रस्ते विकास कामांच्या आगामी निविदांमधील भ्रष्टाचाराबाबत आरोप केल्यानंतर या मुद्द्याबाबत प्रशासनाला धारेवर धरण्यापूर्वीच भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीतून सभात्याग करत काढता पाय घेतला.

विधीमंडळात अ‍ॅड. आशिष शेलार यांनी रस्ते विकास कामांच्या आगामी निविदांमधील भ्रष्टाचाराबाबत आरोप केल्यानंतर या मुद्द्याबाबत प्रशासनाला धारेवर धरण्यापूर्वीच भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीतून सभात्याग करत काढता पाय घेतला. रस्ते आणि आरोग्य विभागाच्या आढाव्यासंदर्भात मुख्यालयाऐवजी इंडियाबुल्स येथील रस्ते सल्लागाराच्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीवरून सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला आडवे हात घेण्याची रणनिती भाजपने आखली होती. परंतु, स्थायी समितीत सुरुवातीलाच यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी अध्यक्षांनी फेटाळून शेवटी परवानगी देतो, असे सांगूनही या मुद्द्यावर आक्रमक होण्याऐवजी सभात्याग करत बाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे पहारेकर्‍यांच्या या सोयीच्या राजकारणाबाबत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपच्या सर्व सदस्यांनी केला सभात्याग

स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात होताच भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी समितीच्या कामकाजाबाबत आपल्याला हरकतीचा मुद्दा काढायचा असल्याचे सांगत अध्यक्षांकडे परवानगी मागितली. परंतु, त्यावर अध्यक्षांनी आपण आपल्याला परवानगी देतो, कामकाज संपल्यानंतर आपण हरकतीचा मुद्दा घ्यावा,असे सांगितले. परंतु आपल्याला सुरुवातीलाच घ्यायचा असा हट्ट भाजपच्या सदस्यांनी धरला. परंतु, त्यांना परवानगी न देता अध्यक्षांनी कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग करत अध्यक्षांचा निषेध केला.

- Advertisement -

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजप गटनेते आणि खासदार मनोज कोटक यांनी, महापालिका प्रशासनाने आगामी अर्थसंकल्पातील रस्ते व आरोग्य या विषयांबाबत ‘इंडिया बुल्स’ या खासगी इमारतीत एका खासगी सल्लागाराच्या कार्यालयात नुकतेच सादरीकरण केले. वास्तविक, पालिकेत रस्त्यांची कामे १५ टक्के कमी दरात मंजूर झालेली असताना याच कामात आता बदल करून कंत्राटदारांना ४० टक्के जादा दरात कामे देण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप केला.

बिल्डरच्या कार्यालयात अर्थसंकल्पाचे सादरीकरण?

पालिका आयुक्तांनी, महापालिकेऐवजी इंडिया बुल्स या खासगी जागेत सल्लागाराच्या जागेत अर्थसंकल्पाबाबतचे सादरीकरण का घेतले, असा सवाल मनोज कोटक यांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेचे कार्यालय सीएसएमटी येथून इंडिया बुल्समधील ई अँड वायच्या कार्यालयात हलवले आहे का, असा सवालही सत्ताधारी शिवसेनेला कोटक यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यात पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; एकाला अटक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -