Eco friendly bappa Competition
घर मुंबई अंबरनाथ 'आयटीआय'ला यंदाचा सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार

अंबरनाथ ‘आयटीआय’ला यंदाचा सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार

Subscribe

शैक्षणिक कामगिरीसाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार यंदा अंबरनाथच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पटकावला आहे.

शैक्षणिक कामगिरीसाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार यंदा अंबरनाथच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पटकावला आहे. त्याबद्दल आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेत २९ व्यवसायांचे प्रशिक्षण

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी पार पडलेल्या पदवीदान आणि सत्कार समारंभात अंबरनाथ औद्योगिक संस्थेला राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि मोठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून प्रचलित आहे. सध्या या संस्थेत १ हजार ७०० प्रशिक्षणार्थी विविध २९ व्यवसायांचे प्रशिक्षण घेत आहेत. असुविधांच्या गर्तेत अडकलेल्या या शैक्षणिक संस्थेने गेल्या काही वर्षात आपला परिसर आणि शैक्षणिक दर्जासाठी कमालीचे काम केले होते. त्यामुळे या संस्थेचा चेहरामोहरा बदलण्यात येथील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना यश आले आहे. सध्या संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थींना तांत्रिक प्रशिक्षणासोबत अनेक उपक्रम राबवले जातात. यात प्रशिक्षणार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास, ऑन जॉब ट्रेनिंग, शिकाऊ उमेदवारी, औद्योगिक सुरक्षा, रोजगार मार्गदर्शनासाठी विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – राधाकृष्ण नार्वेकर यांना पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार


अंबरनाथ आयटीआयचा राज्यात दुसरा क्रमांक

या संस्थेला अंबरनाथ एमआयडीसीतील एएसबी इंटरनॅशनल, गोदरेज, वॅरटीव्ह एनर्जी, सिमेन्स इंडिया, टाटा पावर या नामांकित कंपन्यांचा मोलाचा हातभार लागल्याचे या संस्थेच्या प्राध्यापकांनी सांगितले आहे. तसेच अंबरनाथ येथील एएसबी इंटरनॅशनल या संस्थेत अंबरनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शंभर शिकाऊ उमेदवार कार्यरत असून, २०० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना कायम स्वरूपी रोजगार देण्यात आला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून त्यातून संस्थेची शैक्षणिक कामगिरी उंचावल्याचे येथील प्राध्यापकांनी सांगितले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – हे आहेत २०१८ चे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’चे मानकरी


 

- Advertisment -