घरगुती वीज ग्राहकांना झटका, व्यावसायिकांना दिलासा; काय आहे बेस्टचा प्रस्ताव?

पुढील आर्थिक वर्षासाठी हा प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. त्यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत १८ टक्के वीज दरवाढ नियोजित आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ६ टक्के दरवाढ तर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत दोन टक्के दरवाढ बेस्टने सुचवली आहे. या प्रस्तावाला आयोगाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर त्यानुसार दरवाढ होईल. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

electricity bill

 

मुंबईः मुंबईतील घरगुती वीज ग्राहकांना झटका देणारा प्रस्ताव बेस्टने तयार केला आहे. हा प्रस्ताव बेस्टने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे मांडला आहे. त्यानुसार घरगुती वीजदरात १८ टक्के वाढ सुचवली आहे व व्यावसायिकांच्या वीजदरात ६ टक्के शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव बेस्टने दिला आहे. गेल्या आठवड्यात टाटा पॉवर व अदानी समुहाने वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. महागाईने त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याचे संकेत आहेत.

२०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी हा प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. त्यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत १८ टक्के वीज दरवाढ नियोजित आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ६ टक्के दरवाढ तर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत दोन टक्के दरवाढ बेस्टने सुचवली आहे. या प्रस्तावाला आयोगाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर त्यानुसार दरवाढ होईल. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सध्या शंभर युनिटपर्यंत २ रुपये ९३ पैसे आकारले जातात. ०१ ते ३०० युनिटसाठी ५ रुपये १८ पैसे, ३०१ ते ५०० युनिटला ७ रुपये ७९ पैसे व ५०१ ते १००० युनिटपर्यंत ९ रुपये २ पैसे दर बेस्टकडून आकारला जातो. यामध्ये बेस्टने वाढ सुचवली आहे.

बेस्टने पॉवर व्हिलिंग शुल्कात ५५ टक्के वाढ तर निश्चित शुल्कात (fixed charge) ३३ टक्के वाढ सुचवली आहे. गेल्या आठवड्यात अदानी समुहाने २ ते ७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. टाटा पॉवर कंपनीने १० ते ३० टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

सोसायटीमधील चार्जिंग स्टेशनला दिलासा
गृहनिर्माण सोसायटीतील वाहन चार्जिंग स्टेशनसाठी आकारल्या जाणाऱ्या वीजदरात बेस्टने कपात सुचवली आहे. ही कपात १६ टक्क्यांची आहे. सोसायटीतील चार्जिंग स्टेशनसाठी सध्या प्रति युनिट ४.७९ रुपये आकारले जातात. यामध्ये कपात करुन ४.३ रुपये प्रति युनिट आकारण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे.

रेल्वे, मोनो व मेट्रोच्या वीज दरात कपात
रेल्वे, मोनो व मेट्रोच्या वीज पुरवठा दरात बेस्टने कपात सुचवली आहे. ही कपात १२ टक्के सुचवण्यात आली आहे. सरकारी रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांच्या वीजदरातही ६ टक्के कपातीचा बेस्टचा प्रस्ताव आहे.