घरमुंबईBhiwandi Building Collapse Live : मृतांची संख्या १२ वर, बचावकार्य सुरूच!

Bhiwandi Building Collapse Live : मृतांची संख्या १२ वर, बचावकार्य सुरूच!

Subscribe

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी अद्याप बचावकार्य सुरू आहे. या घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात या बिल्डिंगचे मालक सय्यद अहमद जीलानी याच्याविरुद्ध भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकारी यांच्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३३७, ३३८. ३०४ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. (सविस्तर वृत्त)

- Advertisement -

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचावकार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


कॅबिनेट मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी येथील घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूसदेखील केली.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भिवंडी येथील घटनेवर दुःख व्यक्त केले असून जखमी झालेल्यांना लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ट्विट त्यांनी केले आहे.


भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या घटनास्थळी बचावकार्याची पाहणी करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे दाखल झाले असून पालिका व पोलीस प्रशासनाकडून त्यांनी घटनेचा आढावा घेतला.


आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्यांची नावे –

१) हेदर सलमानी (पु/ २० वर्ष)
२) रुकसार खुरेशी (स्त्री/ २६ वर्ष)
३) मोहम्मद अली (पु/ ६० वर्ष)
४) शबीर खुरेशी (पु/ ३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/ ४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/ २७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५ वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/ १८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/ २२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/ ५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु /४ वर्ष)

मृत व्यक्तीची नावे –

१) झुबेर खुरेशी (पु/ ३० वर्ष)
२) फायजा खुरेशी (पु/ ५ वर्ष)
३)आयशा खुरेशी (स्री/ ७ वर्ष)
४) बब्बू (पु/ २७ वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/ २ वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/ ८ वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/ ६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/ १४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/ १२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/ २८ वर्ष)


भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून यामध्ये २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी भिवंडी अ. केंद्राचे, ठाणे विभागाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे १५ जवान आणि राष्ट्रीय आपत्ती दलाची (एनडीआरएफ) एक तुकडी म्हणजेच ३० जवान उपस्थित असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंतच्या बचावकार्यात २५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले असून आठ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे.

नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारी जिलानी इमारत (पटेल कम्पाऊंड) ही तीन मजली जुनी इमारत आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले आहे. त्यापैकी ८ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत. आम्ही स्वतः घटनास्थळी उपस्थित आहोत. येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भिवंडी तसेच ठाणे आपत्कालिन कक्षाचे कर्मचारी, रुग्णवाहिका, वाहतूक शाखेचे कर्मचारी, परिमंडळ २ मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने कार्यवाही चालू आहे.
– राजकुमार शिंदे, डीसीपी

दुर्घटनेतील मृतांची नावे –

१) फातमा जुबेर बबू (महिला) – २ वर्ष
२) फातमा जुबेर कुरेशी (महिला) – ८ वर्ष
३) उजेब जुबेर (पुरुष) – ६ वर्ष
४) असका म. आबीद अन्सारी (महिला) – १४ वर्ष
५) अन्सारी दानिश म. अलिद (पुरुष) – १२ वर्ष
६) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पुरुष) – २२ वर्ष
७) सिराज अ. अहमद शेख (पुरुष) – २८ वर्ष
८) जुबेर कुरेशी (पुरुष) – ३० वर्ष

दुर्घटनेतील जखमींची नावे –

१) मोमीन शमिउहा शेख (पुरुष) – ४५ वर्ष
२) कौंसर सीराज शेख (महिला) – २७ वर्ष
३) रुकसार जुबेर शेख (महिला) – २५ वर्ष
४) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पुरुष) – १८ वर्ष
५) जुलैखा म. अली. शेख (महिला) – ५२ वर्ष
६) उमेद जुबेर कुरेशी (पुरुष) – ४ वर्ष

भिवंडीतील घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाचे बचावकार्य सुरू

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, September 20, 2020

हेही वाचा –

भिवंडीतील ४३ वर्ष जुनी इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली; ८ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -